वारांगणाचा नारा "एक ऑगस्ट, मतदान फर्स्ट' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सांगली - घर कितीही चांगलं असलं तरी त्याला न्हानीघर असावे लागते. ते नसेल तर घरात दुर्गंधी पसरेल. तसंच समाजाचंही एक न्हानीघर असते. वारांगणाच्या वस्ती या समाजाच्या न्हानीघर असतात. असं धाडसी विधान विदुषी विचारवंत दुर्गा भागवत यांनी केले होते.

वारांगणांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन नेहमीच हेटाळणीचा असतो. मात्र या महिलाही समाजाच्या एक भाग आहेत. त्यांनाही भारतीय राज्यघटनेने समान अधिकार दिले आहेत. या अधिकारांचा जागर करीत येथील सुंदरनगरातील सुमारे दिडशेंवर वारांगणांनी आज मतदानाचा हक्क बजावला. वेश्‍या महिला एडस्‌ निर्मुलन केंद्राच्या अमिराबी शेख यांच्या पुढाकाराने आपल्या महिलांनी मतदानाचा हक्क अधिकार बजावावा यासाठी जागृती केली. येथील प्रभाग 10 चा भाग असलेल्या या वस्तीत एक ऑगस्ट मतदान फर्स्ट असा नारा देत महिलांनी वस्तीमध्ये फलक झळकवला. घरोघरी जाऊन मतदानाला चला असे आवाहन केले. 

Web Title: Sangli News corporation election report