राष्ट्रवादीचे कुपवाडचे नेते धनपाल खोत यांचा पराभव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली - भाजपला ऐनवेळी रामराम ठोकून राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झालेले कुपवाड शहराचे नेते, धनपाल खोत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तेथून स्वाभिमानी विकास आघाडीकडून लढणारे उपमहापौर विजय घाडगे यांनी विजय मिळवला आहे.

या प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, रईसा रंगरेज आणि कॉंग्रेसच्या पद्मश्री पाटील यांचा विजय झाला आहे. 

उपमहापौर विजय घाडगे कॉंग्रेसमध्ये होते, मात्र त्यांनी सत्तेत असताना बंड केले होते. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यांनी ऐनवेळी स्वाभिमानी आघाडी या माजी आमदार संभाजी पवार गटाच्या संघटनेकडून निवडणूक लढवली. त्यांना कॉंग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी छुपी ताकद दिली होती, अशी चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्याला आस्मान चारत घाडगे यांनी मिळवलेला विजय लक्षवेधी ठरला आहे. 

Web Title: Sangli News corporation election report