खासदार संजयकाका पाटील यांना घरच्या प्रभागातच धक्का 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली -  भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना त्यांच्या हक्काच्या प्रभाग पंधरामध्ये जबरदस्त धक्का बसला आहे. तेथे भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले असून काकांचे पाहुणे सावर्डेकर पाटील यांच्या दोन्ही उमेदवारांना पराभव स्विकारावा लागले आहे.

कॉंग्रेसचे युवा नेतृत्व मंगेश चव्हाण यांनी काकांच्या चक्रव्यूह भेदून विजय मिळवला आहे. या प्रभागात चारही जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. कॉंग्रेस आघाडीसाठी हा विजय मोठे बलस्थान ठरणार आहे. 

या संबंध निवडणुकीत खासदार संजय पाटील यांनी तिन्ही शहरांपेक्षा जास्त ताकद प्रभाग पंधरामध्ये लावली होती. अगदी कॉंग्रेसचे काही गट फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली होती. त्या साऱ्या प्रयत्नांना सुरुंग लावत कॉंग्रेसचे मंगेश चव्हाण, आरती वळवडे, राष्ट्रवादीच्या पवित्रा केरीपाळे आणि कॉंग्रेसचे फिरोज पठाण विजयी झाले आहेत. तेथे खासदार पाटील यांचे पाहुणे रणजीत पाटील सावर्डेकर यांचा मोठा पराभव झाला असून सोनल विक्रमसिंह पाटील यांनाही पराभव स्विकारावा लागला आहे. 

खासदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शहरात मोठे मताधिक्‍य घेतले होते. त्या तुलनेत त्यांना आपल्या प्रभागात प्रभाव पाडता आला नाही, हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

Web Title: Sangli News corporation election report