सांगली महापालिकेत भाजप बहुमताच्या दिशेने 

सांगली महापालिकेत भाजप बहुमताच्या दिशेने 

सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या दिशेने कूच केले आहे. 23 जागांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी तर 32 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. सुरु असलेल्या मतमोजणीचे कल पाहता 41 जागांवर भाजप विजयी होण्याची शक्‍यता असून बहुमताचा आकडा भाजप पार करु शकेल अशी स्पष्ट स्थिती आहे. 

सकाळच्या टप्प्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली. सांगली आणि मिरज या दोन्ही ठिकाणी हक्काचे प्रभाग जिंकताना भाजपने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रभागातही घुसखोरी करीत बहुतमाच्या दिशेने कूच केले. मात्तबर पराभूतांमध्ये माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर विवेक कांबळे कुपवाडचे राष्ट्रवादीचे नेते धनपाल खोत यांचा समावेश आहे. खोत यांना कुपवाडमध्ये प्रभाग एक मध्ये स्वाभीमानी आघाडीचे विजय घाडगे यांनी तर प्रभाग 7 मध्ये जामदार यांना त्यांचे चेले गणेश माळी यांनी भाजपमध्ये जाऊन धक्का दिला. 

सर्वात धक्कादायक निकाल प्रभाग पंधराचा लागला. खासदार संजय पाटील यांचे मामेभाऊ रणजीत सावर्डेकर पराभूत झाले. हे घराणे सांगलीतील प्रतिष्ठित असून भारतभीम जोतीरामदादा पाटील यांच्या नातसून सोनल पराभूत झाल्या. सांगलीतील प्रभाग 15 मध्ये धक्कादायक निकाल लागले. खासदार संजय पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचा हा प्रभाग होता. नातलग कुटुंबिय सावर्डेकरांच्या कुटुंबातील सोनल, रणजीत पराभवाचा धक्का बसला. इथे युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश चव्हाण, फारुक पठाण यांनी खासदारांना धक्का देत कॉंग्रेसला इथे एकहाती यश मिळवून दिले. खासदारांनी या प्रभागात पंधरा दिवस तळ ठोकला होता. 

ऐनवेळी भाजपमध्ये दाखल झालेले मिरजेतील नगरसेवक सुरेश आवटी यांनी प्रभाग 3 मधील सर्व उमेदवार विजयी करीत आपण अजिंक्‍य असल्याचे सिध्द केले. त्यांची दोन्ही मुले संदीप व निरंजन विजयी झाले आहेत. प्रभाग 6 माजी महापौर मैन्नुदीन बागवान, माजी महापौर इद्रीस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर नायकवडी, रजीया काझी, नर्गीस सय्यद यांनी विजय मिळवला. प्रभाग 7 मध्ये जामदार फक्त 152 मतांनी पराभूत झाले. त्या प्रभागातील अन्य तीन जागाही जिंकल्या. स्थायी समितीचे विद्यमान सभापती बसवेश्‍वर सातपुते यांना आनंदा देवमाने, गायत्री कुल्लोळी, संगीता खोत असे तीन भाजपचे उमेदवार विजयी झाले. 
..........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com