महापालिकेत सांगलीवाडी आहे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

महापालिका क्षेत्रात सांगलीवाडीचा समावेश आहे का? असा संतप्त सवाल नगरसेवक दिलीप पाटील यांनी स्थायी समिती सभेत केला. तीन दिवसांत पॅचवर्क झाले पाहिजे, असा अल्टिमेटमही त्यांनी दिला आहे. 

सांगली - महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पॅचवर्कची कामे सुरू आहेत, पण प्रशासनाकडून सांगलीवाडीतील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.  गेल्या तीन वर्षांत एकदाही पॅचवर्कचे काम झालेले नाही. त्यामुळे महापालिका क्षेत्रात सांगलीवाडीचा समावेश आहे का? असा संतप्त सवाल नगरसेवक दिलीप पाटील यांनी स्थायी समिती सभेत केला. तीन दिवसांत पॅचवर्क झाले पाहिजे, असा अल्टिमेटमही त्यांनी दिला आहे. 

सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेच्या प्ररंभीच दिलीप पाटील यांनी पॅचवर्कचा प्रश्न उपस्थित केला. सांगलीतील दोन्ही प्रभाग  समितीसाठी पॅचवर्कची निविदा काढण्यात आली आहे. त्यातून काही रस्त्यांच्या पॅचवर्कही झाले, पण सांगलीवाडीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला. 

मृणाल पाटील यांनी दुबार कामांचा प्रश्न उपस्थित केला. शासन व महापालिका निधीत कामे दुबार झाली आहेत.  ही कामे बदलून त्याच प्रभागातील दुसरी कामे करण्याचा ठराव स्थायी समितीने केला आहे. पण त्यावर प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप केला. यावर अभियंता सतीश सावंत यांनी या नऊ  कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असल्याचा खुलासा केला. 
 

Web Title: Sangli news Corporation Standing Committee meeting