सांगली परिसरात "चिऊताईं'ची गणना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

सांगली - अंगणातील चिमण्यांचा किलबिलाट जणू आता बंदच झाला आहे. क्वचित कोठेतरी चिऊताईचे दर्शन घडते. चिऊताईंचा किलबिलाट पुन्हा ऐकू यावा म्हणून प्राणीमित्रांकडून प्रयत्न केले जातात. त्यात नागरिकांनीही सहभागी होणं गरजेचे आहे. त्यासाठीच "बर्डसॉंग' आणि खोपा बर्ड हाऊस संस्थेतर्फे चिमण्यांची गणना करण्याच्या मोहीमेला आजपासून प्रारंभ झाला. 

सांगली - अंगणातील चिमण्यांचा किलबिलाट जणू आता बंदच झाला आहे. क्वचित कोठेतरी चिऊताईचे दर्शन घडते. चिऊताईंचा किलबिलाट पुन्हा ऐकू यावा म्हणून प्राणीमित्रांकडून प्रयत्न केले जातात. त्यात नागरिकांनीही सहभागी होणं गरजेचे आहे. त्यासाठीच "बर्डसॉंग' आणि खोपा बर्ड हाऊस संस्थेतर्फे चिमण्यांची गणना करण्याच्या मोहीमेला आजपासून प्रारंभ झाला. 

घराच्या अंगणात कधी-कधी घरात येऊन घरटे शोधणाऱ्या चिमण्या शोधूनही सापडत नाहीत, असे चित्र आहे. अंगणात तांदूळ टाकून बघूनही चिमण्या येत नाहीत. अनेकांनी लहानपणी चिमण्या बघितल्या तरी, परंतु आता चिमण्यांचे दर्शन दुर्मिळ झाल्यामुळे लहान मुलांना चित्रातच चिमणी दाखवावी लागते. सिमेंटच्या जंगलात चिमण्यांच्या घरट्यांना जागाच राहिली नाही. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. निसर्गचक्रातील चिमण्यांचे महत्त्व मोठे आहे. चिमण्यांचे अस्तित्व जिवंत ठेवावे, त्यांची संख्या वाढण्यासाठी उपाययोजना कराव्यात म्हणून अनेक निसर्गप्रेमी धडपड करत आहेत. त्यातीलच या संस्था प्रतिवर्षीप्रमाणे चिमण्यांची गणना करतात. चिमण्यांची संख्या किती, संख्या कमी होण्याची कारणे काय? हे समजून घेऊन त्यावर उपाय योजना करण्यासाठी गणनेचा उपयोग होतो. 

जागतिक चिमणीदिनी कळणार संख्या 

गतवर्षी अकरा शाळेतील 184 विद्यार्थ्यांनी सांगली आणि परिसरात दिवसभर चिमण्यांची गणना केली. तेव्हा 3 हजार 170 चिमण्यांची नोंद झाली. यंदाच्या वर्षीची गणनेची संख्या जागतिक चिमणी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम जाहीर केली जाणार आहे. 

यंदाच्या वर्षी कन्या पुरोहित प्रशाला, सांगली हायस्कूल, गर्ल्स इंग्लिश स्कूल, सिटी इंग्लिश स्कूल, रजपूत स्कूल, सिटी हायस्कूल, मालू हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, गणपतराव आरवाडे, दडगे हायस्कूल आदी शाळांचा यात सहभाग आहे. आज प्रत्यक्ष मोहिमेला प्रारंभ झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांना पत्रकाचे वाटप करुन आपल्या परिसरातील चिमण्यांची संख्या मोजण्याचे काम सोपवण्यात आले आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेत घराजवळील परिसर, शाळा, दुकाने, गच्चीवर दिसणाऱ्या चिमण्यांची संख्या नोंदवून फॉर्म भरला जाणार आहे. या मोहीमेत पालकांनचाही उत्स्फुर्त सहभाग दिसून आला. 

या मोहिमेत खोपा बर्ड हाऊसचे सचिन शिंगारे, सुनिता शिंगारे, बर्डसॉंगचे शरद आपटे, ऍनिमल सहाराचे अजित काशीद, निनाद गोसावी, तेजस्विनी पाटील, गणेश दातार, जगन्नाथ कवले आदी प्राणीमित्रांसोबत विद्यार्थ्यांचा यात मोहीमेत सहभाग आहे. 

 

Web Title: Sangli News counting of House sparrow