सांगलीतील पाटील दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी हवालदार ठाकूरविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मिरज - खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्या केलेल्या अभिजित विजयकुमार पाटील आणि त्यांची पत्नी कल्याणी पाटील या दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणात हवालदार साईनाथ ठाकूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मिरज - खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्या केलेल्या अभिजित विजयकुमार पाटील आणि त्यांची पत्नी कल्याणी पाटील या दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणात हवालदार साईनाथ ठाकूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हवालदार ठाकूर हे सध्या येथील महात्मा गांधी पोलिस ठाण्यात गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहेत. याचप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी सावकार पंडित बळवंत नाईक, लक्ष्मीनिवास भूषण प्रसाद तिवारी बेबी मोहन अंडीकाट या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

पंडित नाईक व बेबी अंडीकाट या दोघांकडून अभिजित पाटील यांनी काही रक्कम कर्जाऊ घेतली होती. या व्यवहारात लक्ष्मी निवास तिवारी हे मध्यस्थ होते. गेल्या चार वर्षांपासून या तिघांकडून कर्ज आणि त्यावरील भरमसाट व्याजासाठी या सावकारांनी पाटील दाम्पत्यास त्रास दिला. गांधी चौकातील त्यांच्या सार्थ मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन वसुलीसाठी गुंडाकरवी धमक्‍याही दिल्या.

काही वेळा दुकानाच्या काउंटरमधून काही रोकडही नेली. यामुळे पाटील हे अपमानित झाले. त्यांच्या पत्नी कल्याणी यांनी रमा उद्यान परिसरातील बंगल्यात आत्महत्या केली. त्यानंतर काही महिन्यांत पती अभिजितने सुंदरनगरमधील घरात विषारी औषध पिले. याबाबत गांधी चौकी पोलिस ठाण्यात नोंद झाली. या दोघांचा विवाह आठ महिन्यांपूर्वीच झाला आहे. 

या प्रकरणात आता पोलिस साईनाथ ठाकूर याच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकारांच्या अहवालावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आज हवालदार ठाकूर यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी 
पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या विरोधातही हवालदार ठाकूर यानी तक्रार केली असल्याचे समजते.

Web Title: Sangli News crime against constable Thakur