डीएसके विरोधात सांगलीत फसवणुकीचा गुन्हा  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सांगली : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात सांगलीतही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके कंपनीच्या योजनेत गुंतवलेले 8,95,000 रुपयांची ठेवीची रक्कम मुदत पुर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि त्यावरील व्याज परत न देता फसवणूक केली आहे. 

सांगली : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात सांगलीतही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके कंपनीच्या योजनेत गुंतवलेले 8,95,000 रुपयांची ठेवीची रक्कम मुदत पुर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि त्यावरील व्याज परत न देता फसवणूक केली आहे. 

याबाबत किरण अनंत कुलकर्णी यांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सांगलीतील सुमारे 30 जणांची तीन कोटींवर रकमेची फसवणूक झाल्याची माहिती आहे.  

अधिक माहिती अशी, किरण कुलकर्णी हे सेवानिवृत्त असून त्यांनी ते नागराज कॉलनीत गौरी शंकर अपार्टमेंट येथे राहतात. त्यांनी डीएसकेंच्या कंपनीत आठ लाख 95 हजार रुपये गुंतवले होते. माधवनगर रोडवरील बजाज ऍटोच्या शेजारी असलेल्या एस के कंपनीच्या ब्रॅंचमध्ये त्यांनी ही गुंतवणूक केली होती. त्याची मुदत पुर्ण झाल्यानंतर सदर रक्कम व त्यावरील व्याज परत न देता डी. एस. ग्रुप अँड कंपनीचे संचालक, भागीदार यांनी संगनमताने फसवणूक केल्याबद्दल किरण कुलकर्णी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

या तक्रारीवरुन दीपक सखाराम कुलकर्णी, हेमंत दिपक कुलकर्णी, शिरीष दिपक कुलकर्णी (सर्व डीएसके हाऊस, जंगली महाराज रोड, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दरम्यान, किरण कुलकर्णी यांच्यासह सांगलीतील सुमारे 30 जणांनी डीएसके कंपनीत गुंतवणूक केली होती. त्यांच्या ठेवींची एकूण रक्कम सुमारे सव्वा तीन कोटींच्या घरात आहे. याबाबत गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक राजेंद्र मोरे यांना गुंतवणुकीची माहिती दिली आहे. सध्या हा आकडा 30 जणांचा असला तरी सांगलीतील गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.  

डीएसकेंची प्रॉपर्टी सील  
डीएसकेंच्या सांगली, पुणे, सातारा येथील प्रॉपर्टी सील केल्याची माहिती असून यामध्ये मिरज पंढरपूर रोडवरील डीएसकेंची एक प्रॉपर्टी सील केल्याची चर्चा आहे. 

Web Title: Sangli News crime against DSK