चंदन झाडांचे चोर फरारीच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

सांगली - जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याजवळील चंदनाची तीन झाडे चोरीस गेल्याच्या शोधासाठी पोलिस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात दोन पथके गेली आहेत. सायंकाळपर्यंत तरी तपासात काहीही प्रगती झालेली नव्हती. 

सांगली - जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याजवळील चंदनाची तीन झाडे चोरीस गेल्याच्या शोधासाठी पोलिस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात दोन पथके गेली आहेत. सायंकाळपर्यंत तरी तपासात काहीही प्रगती झालेली नव्हती. 

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याजवळील चंदनाची तीन झाडे तोडून ओंडके तस्करांनी पळवून पोलिस दलाचे नाक कापले आहे. गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा झालेल्या प्रकाराची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. दहा महिन्यांपूर्वी याच पोलिस अधीक्षकांच्या कारकिर्दीत पाच लाख रुपयांचे चंदन लंपास केले होते. त्यावेळी चोरटे मुद्देमालासह सापडले होते. यावेळी मात्र त्यांनी ओंडक्‍यांसह पोलिसांच्या हातावर तुरी दिली आहे. दरम्यान 12 ऑक्‍टोबर 2016 रोजी याच परिसरात चंदनाची तस्करी झाली होती. नेमका तसाच प्रकार दोन दिवसांपूर्वी प्रकार घडला. अधीक्षकांच्या बंगल्याचा आवार फळ झाडांनी फुलले आहे. पेरूची बागही बहरली आहे. बंगल्याच्या मागील बाजूस अवघ्या शंभर फुटांवर ही झाडे आहेत. तेथे जवळच ट्रॅफीक गार्डनही आहे. गेस्ट हाऊस आणि पुढे कृष्णा मॅरेज हॉल. इथे कायम पोलिसांची कुमक असते. जवळच पोलिसांचे शस्त्रागारही आहे. तेथेही दिवसरात्र पहारेदार असतात. बुधवारी मध्यरात्री सात ते आठ जणांनी या परिसरात घुसून करवतीच्या सहाय्याने तीन झाडे कापली. फांद्याचा आवाज आल्यानंतर बंगल्यातील रक्षक शरद रामनाथ मेंगाळ रायफल घेऊन तिकडे धावले. त्यावेळी 25 ते 30 वयोगटातील चड्डी-बनियन घातलेले सात-आठ चोरटे त्यांना दिसले. त्यांनी पाठलाग केला; परंतु अंधाराचा फायदा घेत ते रेल्वे उड्डाण पुलाच्या दिशेने पळत सुटले. 

Web Title: sangli news crime Sandalwood tree

टॅग्स