सांगली: बिसूरच्या ओढ्यात दिसली मगर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

बंधारा अडवला नाही म्हणून...
वीस वर्षापूर्वी शासनाने बांधलेल्या बंधा-यात एक थेंब पाणी अडवले नाही. लोखंडी दरवाजे गंजून बाद झालेत. बंधा-यात गटारीचं पाणी साचतं. ते उचलून पुढे सोडण्याचा पर्याय दुर्लक्षित आहे. आता तर धुळगावला शेरीनाला योजनेतून सोडलेले पाणी याच ओढ्यातून पुन्हा क्रुष्णेत मिसळते. बंधा-यात पाणी अडवले असते तर मगर आली नसती.

सांगली: बिसूर (ता. मिरज, जि. सांगली) येथे आज मगरीचे दर्शन झाले. कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याच्या फुगवट्यातून ती आली असावी. बुधगाव बिसूर रस्त्यावर ओढ्यावरील पुलाच्या उत्तरेला ती दिसली. साधारण साडेपाच फूट लांब आहे. 2005 मध्येही अशीच एक मगर नदीच्या पाण्यातून आली होती. ती ठिकाणी थांबली होती त्या ठिकाणी आज मगरीचे दर्शन झाले. बघ्यांनी गर्दी केली.

वनक्षेत्रपाल वाघमारे यांना माहिती कळताच त्यांनी पोलिस पाटील सतिश पाटील व प्राणीमित्रांसह भेट दिली. मगर असल्याची खात्री करुन लोकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले.

बंधारा अडवला नाही म्हणून...
वीस वर्षापूर्वी शासनाने बांधलेल्या बंधा-यात एक थेंब पाणी अडवले नाही. लोखंडी दरवाजे गंजून बाद झालेत. बंधा-यात गटारीचं पाणी साचतं. ते उचलून पुढे सोडण्याचा पर्याय दुर्लक्षित आहे. आता तर धुळगावला शेरीनाला योजनेतून सोडलेले पाणी याच ओढ्यातून पुन्हा क्रुष्णेत मिसळते. बंधा-यात पाणी अडवले असते तर मगर आली नसती.

शेरीनाला इकडेही 
शेरीनाला पूर्वी सांगली, सांगलीवाडीला त्रास देई. आता तो क. डिग्रज, मौ. डिग्रज, पद्माळे, कवलापूर, बिसूर, काकडवाडी, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी, धुळगाव या गावांनाही त्रासदायक ठर्णार. धुळगाव योजना मनपा कारभा-यांमुळे फेल ठरली आहे.

Web Title: Sangli news crocodile in Krushna river

टॅग्स