आमणापूरला मगरीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

अंकलखोप - पलूस तालुक्‍यातील आमणापूर-धनगाव रस्त्यावरील अनुगडेवाडीजवळ असणाऱ्या ओढ्याच्या पुलाखाली चार फुटी मगर मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वन विभागास कळविले. वनरक्षक प्रकाश पाटील यांनी धाव घेतली. पंचनामा व उत्तरीय तपासणीत मगरीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. 

अधिक माहिती अशी, अनुगडेवाडीजवळ असणाऱ्या ओढ्याच्या पुलाखाली आज सकाळी एका प्लास्टिकच्या पोत्यात मगरीचे शेपूट दिसून आले. त्यानंतर एकच धावपळ उडाली. मगरीची कोणतीच हालचाल होत नसल्याने ग्रामस्थांनी तातडीने वन विभागास कळविले. वनरक्षक पाटील यांनी तातडीने धाव घेतली. त्यावेळी ती मगर मृतावस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पंचनामा करून पलूसमधील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उत्तरीय चाचणीसाठी नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन रहाणे यांनी मगरीचे विच्छेदन केले असता डोक्‍यावर घाव लागून मगरीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, ही मगर नर जातीची असून, ती तीन दिवस उपाशी असल्याचे समजले.  या वेळी वनक्षेत्र अधिकारी नितीन कालेल, राजेश पाटील उपस्थित होते.

Web Title: Sangli News crocodile murder in Aamanpurla