दंडोबा हिल मॅरेथॉन १९ ऑगस्टला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली - शिवतेज कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (भोसे), सांगली स्पोर्टस्‌ फाऊंडेशन आणि राजा स्वामी स्पोर्टस्‌ ग्रुपच्यावतीने तिसरी दंडोबा हिल मॅरेथॉन १९ ऑगस्ट रोजी होत आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील भोसे (ता. मिरज) येथील यल्लमा मंदिरासमोर सकाळी आठ वाजता ती सुरू होईल.

सांगली - शिवतेज कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (भोसे), सांगली स्पोर्टस्‌ फाऊंडेशन आणि राजा स्वामी स्पोर्टस्‌ ग्रुपच्यावतीने तिसरी दंडोबा हिल मॅरेथॉन १९ ऑगस्ट रोजी होत आहे. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील भोसे (ता. मिरज) येथील यल्लमा मंदिरासमोर सकाळी आठ वाजता ती सुरू होईल. जतीन शहा, संजय परमणे, सचिन स्वामी, सुरेश भोसले यांनी संयुक्तपणे ही माहिती दिली.

यंदाची स्पर्धा तिसरी आहे. ३५ वर्षांखालील महिला व पुरुषांसाठी पाच कि. मी. अंतराची ग्रीन रन स्पर्धा होईल. खुला गट पुरुषांसाठी १२ कि. मी. अंतर आहे. खुला गट महिलांसाठी सात कि. मी. चा आहे. २० वर्षांखालील मुलांसाठी सात कि.मी., २० मुलींसाठी पाच कि.मी.  अंतर आहे. १६ व १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी  तीन कि.मी. अंतराची स्पर्धा आहे. भोसे पंचक्रोशीतील १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा आहे.  ग्रीन रन गटातील प्रथम तीन विजेते व इतर गटातील प्रथम दहा 
विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातील.

राज्यस्तरीय स्पर्धेला राज्य संघटनेची मान्यता आहे. डोंगर पठारावर होणारी स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक ठिकाणी प्रथमोपचार, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. खेळाडूंना जेवण, नाष्टा दिला जाईल. स्पर्धेनंतर तत्काळ बक्षीस वितरण आहे. 
www.dandobahill marathonsangli. com संकेतस्थळावर खेळाडूंनी नोंदणी करावी. सुभाष सूर्यवंशी, लव्हाजी खामकर, भास्कर यादव, डॉ. गणेश चौगुले, विशाल भगत आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli News Dandoba Hill Marathon on 19 August