मायनरकर वसुलीला आल्यास चाबकाने फोडून काढण्याचा शेतकरी संघटनेचा ठराव 

संतोष भिसे
सोमवार, 26 मार्च 2018

मिरज - ढवळी शेतकरी संघटनेने येथे विजबिल व मायनर कराची होळी केली. मायनर कर वसुलीला आल्यास चाबकाने फोडून काढण्याचा शेतकरी संघटनेचा ठराव करण्यात आला आहे.

मिरज - ढवळी शेतकरी संघटनेने येथे विजबिल व मायनर कराची होळी केली. मायनर कर वसुलीला आल्यास चाबकाने फोडून काढण्याचा शेतकरी संघटनेचा ठराव करण्यात आला आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य महादेव कोरे म्हणाले, 60 वर्षे होऊन गेली तरीही  मायनर कर जबरदस्तीने वसूल केला जात आहे. तो ताबडतोब बंद करावा. पावसाचे पाणी नदीत वाहते,  ते आम्ही पंप लावून उपसतो व जीवनावश्यक धान्य पिकवतो. त्यावर जनता आणि जनावरे  जगवतो. साठ वर्षे होऊन गेली तरी मायनर कर बंद होत नाही. अन्यायकारक मायनर कर आम्ही भरणार नाही.

यावेळी कमलेश्वर कांबळे, नानासाहेब काणे, प्रदीप कोरे, बाबासाहेब मार्गे, नरसगोंड गौराजे, विजय पाटील, शिवाप्पा गौराजे, शितल हारूगीरे, विनोद आळते, बाळासाहेब चित्रे, बाळासाहेब कमते, बाळासाहेब लंगोटे, संजय स्वामी, सुरेश मगदुम आदी उपस्थित होते.
 

Web Title: Sangli News Davli Farmers organisation agitation

टॅग्स