तडसर येथे विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान

संतोष कणसे
मंगळवार, 22 मे 2018

कडेगाव - तडसर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे वनक्षेत्रालगतच्या विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभाग व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले. 

कडेगाव - तडसर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे वनक्षेत्रालगतच्या विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभाग व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले

तडसर येथे वनक्षेत्रालगत गंगाराम तुकाराम जाधव या शेतकऱ्याची विहिर आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने पाण्याच्या शोधात असलेले हरीण आज येथील विहिरीत पडले. याबाबत श्री. जाधव यांनी सकाळी साडेआठ वाजता वन विभागाला माहिती दिली.

त्यानंतर कडेगाव वन विभागाचे वनक्षेत्रपाल नितीन काळेल यांचेसह वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ हरणाच्या सुटकेसाठी दाखल झाले. सर्वांनी जाळीच्या सहाय्याने केवळ अर्ध्या तासात हरणाला विहिरीतून बाहेर काढले. खोल विहिरीतून बाहेर निसर्गाच्या सहवासात येताच अत्यानंदाने हरणाने टुनकण उडी मारत येथील वनक्षेत्रातील अधिवासात हे हरिण पसार झाले.  हरणाला जीवदान मिळाल्याने रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाल्याचे समाधान वन विभागाच्या कर्मच्याऱ्यांच्याही चेहऱ्यावर दिसत होते. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनक्षेत्रपाल नितीन काळेल, वनपाल ए. पी. सवाखंडे, मोहन महाडिक, वनरक्षक,जितेंद्र खराडे, सिकंदर मुल्ला आदी सहभागी झाले होते

 

Web Title: Sangli News Deer Survival in Tadsar