वेटलिफ्टिंगमध्ये देवांगचा दरारा 

वेटलिफ्टिंगमध्ये देवांगचा दरारा 

गुजराती माणूस व्यापार, उद्योगधंदा आणि इतर व्यवसायात गुंतला असताना याच समाजातील देवांग ठक्कर या तरूणाने क्रीडा क्षेत्राकडे लक्ष दिले. समाजातील इतर हात वही-पेन उचलून आकडेमोड करीत असताना देवांगने वजने उचलणे सुरू केले. भाऊ प्रणवने वेटलिफ्टिंगमध्ये पदक पटकावल्याची बातमी पेपरमध्ये वाचली. आपले नाव, छायाचित्र प्रसिद्ध झाले पाहिजे म्हणून जिद्द, चिकाटीने सराव सुरू केला. तीन वर्षापूर्वी पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. चार वर्षात 16 सुवर्ण, पाच आणि दोन कास्य पदके पटकावून अचंबित करत दरारा निर्माण केला. राष्ट्रीय, कॉमनवेल्थ, आशियाई, ऑलिम्पिकपर्यंत जाण्याचे स्वप्न असल्याचे देवांग सांगत होता. 

त्याचा मोठा भाऊ प्रणव शाळेत असताना ज्युदो खेळायचा. त्याची ताकद पाहून शिक्षिकांने वेटलिफ्टिंगचा सल्ला दिला. त्यामुळे प्रणव दिग्विजय व्यायाम संस्थेत प्रशिक्षक नाना सिंहासने, किरण सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होता. त्याची बातमी एकदा वृत्तपत्रात आली. ती वाचून हेवा वाटला. आपणही वेटलिफ्टिंग करू शकतो, असा आत्मविश्‍वास आला. 13 व्या वर्षी सराव सुरू केला. पहिल्याच वर्षी 2013 मध्ये 77 किलो वजन गटात भाग घेऊन सुवर्णपदक पटकावले. नंतर पदकांची लयलूट सुरू ठेवली. ग्रामीण, शालेय जिल्हा, ग्रामीण विभागीय, शालेय जिल्हा व शालेय राज्य व ग्रामीण राज्य स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली. चार वर्षात 16 सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कास्य पदके पटकावली. प्रशिक्षक नानांनी ताकद आणि टॅलेंट हेरले. सांगलीचा लौकीक तो वाढवेल, असा त्यांनाही आत्मविश्‍वास वाटतो. 

देवांग रोज सहा तास सराव करतो. गुजराती समाज व्यापार, उद्योग व व्यवसायात अग्रेसर आहे. परंतू त्याने क्रीडा क्षेत्र निवडले. गुजराती समाजात अशी कामगिरी करणारा तो जिल्ह्यातील एकमेव आहे. प्रशिक्षक सिंहासने आणि नंदूभाई ठक्कर यानी प्रोत्साहन व पाठबळ दिले. अल्पावधीतील कामगिरी पाहून अनेकजण अचंबित झालेत. आई-वडीलांनीदेखील वेगळ्या क्षेत्रात करीअर करताना साथ दिली. देवांग जी. ए. कॉलेजमध्ये बारावी करतोय. राष्ट्रीय, कॉमनवेल्थ, आशियाई स्पर्धानंतर ऑलिम्पिकला जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सराव सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com