महापरिवर्तनाची सुरुवात सांगलीतून करा - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

सांगली - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने जनतेची चार वर्षांत सर्व बाबतीत फसवणूक केली आहे. तरुण, व्यापारी, उद्योजक, शेतकरी, शेतमजूर सर्वांच्याच मनात सरकारबद्दल संताप आहे. हा राग महापालिका निवडणुकीत मतपेटीतून व्यक्त करा आणि महापरिवर्तनाची सुरुवात सांगलीतून करा, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार आज मुंडे यांच्या हस्ते झाला. 

शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्टेशन चौकात झालेल्या कार्यक्रमात श्री. मुंडे यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला आणि ज्या वेळी सांगलीकडे राज्याचे नेतृत्व आले आहे, तेव्हा राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे, हीच परंपरा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीही सुरू राहणार असून, २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी सत्तेत येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार श्रीमती सुमन पाटील उपस्थित होत्या. 

मुंडे म्हणाले, ‘‘शेतकरी, शेतमजूर सामान्यांचा लढा राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रेतून लढला. अच्छे दिन, महागाई कमी करण्याच्या नावावर जनतेला फसवले. मांसबंदी, नोटबंदी केली, मात्र आता चुकलो तर मोदीबाबा नसबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत. महागाई चारपटीने वाढली, रोजगार नाहीत त्यामुळे तरुणाई संतापली आहे. धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत समाजाची फसवणूक केली आहे. महिला, मुली सुरक्षित नाहीत याचा राग असेल, संताप असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा.’’

Web Title: Sangli News Dhananjay Munde comment