आटपाटी तालुक्यात डाळिंब बागांत तेल्या रोग

नागेश गायकवाड
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

आटपाडी - तेल्या रोगाला पोषक वातावरण मिळाल्यामुळे मृग बहरात धरलेल्या डाळिंब बागात ‘तेल्या’ने धुमाकूळ घातला आहे. तालुक्‍यात जवळपास तीन हजार एकर क्षेत्र बाधीत झाले आहे. तेल्याच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या शिफारशींसह विविध प्रयोग केलेत, तरीही तेल्या नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे.

आटपाडी - तेल्या रोगाला पोषक वातावरण मिळाल्यामुळे मृग बहरात धरलेल्या डाळिंब बागात ‘तेल्या’ने धुमाकूळ घातला आहे. तालुक्‍यात जवळपास तीन हजार एकर क्षेत्र बाधीत झाले आहे. तेल्याच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या शिफारशींसह विविध प्रयोग केलेत, तरीही तेल्या नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे.

आटपाडी तालुक्‍यात डाळिंबाचे जवळपास बारा ते चौदा हजार एकर क्षेत्र आहे. यातून शेतकरी दर्जेदार डाळिंबाची निर्मिती करतो. तसेच अलीकडे निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादनही वाढत चालले आहे. तालुक्‍यात टेंभूचे पाणी आल्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांनी बागा धरण्याच्या हंगामात बदल केले आहेत. टेंभूच्या पाण्यावर मेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी बागा धरल्या आहेत.

तसेच शेवटच्या टप्प्यात पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पहिला पाऊस ७ जूनला पडल्यावर हंगाम धरला. सुरवातीला स्वच्छ वातावरण मिळाल्यामुळे चांगले सेटिंग झाले आहे. या बागेतील फळे सध्या हिरवी आणि पेरूच्या आकाराची आहेत. बागा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. दीड ते दोन महिन्यांनी डाळिंबाची विक्री सुरू होऊ शकते.

उष्णता वाढल्यामुळे बागात आर्द्रता वाढली आहे. हे वातावरण तेल्यासाठी अत्यंत पोषक असते. तेल्यासाठी पोषक वातावरण मिळाल्यामुळे अनेक भागात तेल्याने मोठा धुमाकूळ घातला आहे. तालुक्‍यातील पश्‍चिम भागात तेल्याचा मोठा प्रादुर्भाव आहे. घाणंद, नेलकरंजी, जांभूळणी, करगणी, शेटफळे, आटपाडी, बोंबेवाडी, कौठूळी, आंबेवाडीसह शेजारील सांगोला तालुक्‍यातील कोळा, नागज, चोपडी, बलवडी, नाझरा आदी भागात मोठ्या प्रमाणावर तेल्या पसरला आहे.

बागेत तेल्या आला. त्याच्या नियंत्रणासाठी महागडी फवारणी केली तरीही नियंत्रण न आल्यामुळे शेवटी बाग सोडून दिली आहे.
- महादेव जुगदर (जांभूळणी)

Web Title: sangli news disease on pomegranate