सांगली महापालिकेत राडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

सांगली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले फलक महापालिकेच्या अतिक्रण विभागाने काढले. या कारणावरून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयावर हल्ला चढवला. प्रभाग 1 कार्यालयात घुसून तोडफोड केली.

सांगली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले फलक महापालिकेच्या अतिक्रण विभागाने काढले. या कारणावरून संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयावर हल्ला चढवला. प्रभाग 1 कार्यालयात घुसून तोडफोड केली. तसेच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यास मारहाण करण्यात आली. दुपारी बारा ते एकच्या सुमारात हा प्रकार घडला.

शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त चौका-चौकात डिजीटल फलक लावण्यात आले होते. ते काल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढले. शहरातील फलक काढल्यामुळे काही संघटनेचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी सोमवारी महापालिकेच्या प्रभाग 1 कार्यालयात घुसून तोडफोड सुरू केली. टेबल, खुर्च्या, टेबलावरील काचा, खिडक्‍या, संगणक फोडले. कपटाचे कुलुप काढून साहित्य फेकून दिले. महापालिकेतील अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी दिलीप घोरपडे यांनाही मारहाण करण्यात आली. 

दरम्यान महापालिकेतील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी मनपा कर्मचारी संघटनेतर्फे निषेध करून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. सांगली शहर पोलिसांनी महापालिकेसमोर तत्काळ बंदोबस्त वाढवला असून तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title: Sangli News disput in Sangli Municipal Corporation