राज्यभर "आटपाडी मॉडेल' राबवा - डॉ. पाटणकर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

सांगली - एकात्मिक पाणी वापर आणि बंद पाइप सूक्ष्म सिंचनचे आटपाडी तालुका मॉडेल राज्यभर राबवावे, यासाठी शासनाने कालबद्ध कृती आराखडा तयार करून आर्थिक तरतूद करावी. त्याची अंमलबजावणी तातडीने राज्यातील दुष्काळी तालुक्‍यातून सुरू करावी. ऑक्‍टोबरपर्यंत ठोस कारवाई न झाल्यास 24 ऑक्‍टोबरपासून राज्यव्यापी मेळावे घेऊन आंदोलन छेडू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी आज दिला. 

डॉ. पाटणकर म्हणाले, ""श्रमिक मुक्ती दलाने 25 एप्रिल 2015मध्ये केलेल्या आंदोलनामुळे तासगाव-आटपाडी समन्यायी पाणीवाटपाच्या पथदर्शक प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत अंतिम मंजुरी देण्याचा निर्णय झाला. हे श्रमिक मुक्ती दल आणि पाणी संघर्ष चळवळीच्या संघर्षाचे यश आहे. हा आराखडा राज्यभर राबवल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. त्यामुळे कर्जबाजारीपणा संपेल. उपसा योजनांचे वीजबिल शेतकऱ्यांकडून वसूल न करता फक्त पाणीपट्टी वसूल केली जावी, याचीही तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभर शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन आंदोलन सुरू करू.''

Web Title: sangli news dr. bharat patankar

टॅग्स