सरकारला नमवल्याशिवाय तलवार म्यान करणार नाही - डॉ. एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

कोल्हापूर - वीज दरवाढ, सरकारी पाणीपट्टी दरवाढ व पोकळ थकबाकीविरोधात राज्यातील शेतकऱ्यांचा मंगळवारी (ता. २७) विधान भवनावर सर्वपक्षीय धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘‘भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. या सरकारला नमवल्याशिवाय मोर्चाची तलवार ‘म्यान’ करणार नाही,’’ असा इशारा ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला.

कोल्हापूर - वीज दरवाढ, सरकारी पाणीपट्टी दरवाढ व पोकळ थकबाकीविरोधात राज्यातील शेतकऱ्यांचा मंगळवारी (ता. २७) विधान भवनावर सर्वपक्षीय धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘‘भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. या सरकारला नमवल्याशिवाय मोर्चाची तलवार ‘म्यान’ करणार नाही,’’ असा इशारा ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला.

या प्रश्‍नावर खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांनीही या मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. बाजार समिती येथे मोर्चाच्या तयारीसाठी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पाळलेली नाहीत. ऊर्जामंत्री बावनकुळे यांना दिलेला शब्द पाळता येत नाही. त्यांना विचारलेल्या प्रश्‍नावर ते मुख्यमंत्र्यांना विचारून सांगतो, असे उत्तर देतात किंवा मुख्यमंत्री वीजदर कमी करत असतील तर मी तयार आहे, असे सांगतात. राज्यातील ४१ लाख शेतीपंप वीज ग्राहकांच्या बिलात चुकीच्या पद्धतीने पोकळ थकबाकी दाखवली आहे. शासनाने लबाडीने वीज दरवाढ केली आहे.

उपसा जलसिंचन योजनांचा वीजदर प्रतियुनिट १ रुपये १६ पैसे निश्‍चित केला आहे, त्याची अंमलबजावणी केलेली नाही. राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. एकीकडे शासन आपली आश्‍वासने पाळत नाही आणि दुसरीकडे मात्र प्रस्तावित सरकारी पाणीपट्टी दरवाढ केली, हे बरोबर नाही.
- डॉ. एन. डी. पाटील,
ज्येष्ठ नेते

जी वीज शेतकऱ्यांनी वापरलीच नाही, त्या विजेचे पैसे शेतकऱ्यांकडून वसूल केले जात असतील तर ते सहन करून घेतले जाणार नाही. सरकार केवळ घोषणा देत आहे. शेतमालाला हमीभाव देण्याची घोषणा केली होती; मात्र आता तूर खरेदी करायला यांच्याकडे पैसे नाहीत. आमचा खिसा मोकळा आहे, असे धडधडीत सांगितले जात आहे. महावितरणची वीज बिले भरू नका म्हणून थकीत मुद्दल रकमेच्या ५० टक्के रक्कम भरण्याची सवलत देऊन सुधारित कृषी संजीवनी योजना राबवली पाहिजे. लघुदाब व उच्चदाब सर्व शेतीपंप वीज ग्राहकाचे सवलतीचे योग्य दर निश्‍चित केले पाहिजेत.’’ 

‘जालना येथे पोलिस चाळीतच वीज चोरी’
खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘कार्यक्रमानिमित्त जालना येथे गेलो होतो. शासकीय विश्रामगृहाजवळ पोलिस चाळ (कॉलनी) आहे. या चाळीत पोलिसांनीच आकडा टाकून वीज चोरून घेतली होती. आता मुख्यमंत्र्यांकडे असणारे गृहखातेच चोर असेल तर बाकीच्यांचा विचारच करायला नको.’’

Web Title: Sangli News Dr N D Patil comment