दुबईतील नोकरीसाठी सव्वादोन लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मिरज - दुबईत मॉल, विमानतळ, मोठी हॉटेल्स या ठिकाणी नोकऱ्या लावण्यासाठी एकाने सहा जणांना तब्बल सव्वादोन लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणी महेबूब मोईद्दीन सय्यद (रा. किल्ला भाग, मिरज) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, तो फरारी झाला आहे. 

ट्रॉली बॉय, विमानतळावर बाउन्सर, हॉटेलमध्ये सफाई कामगार, याशिवाय हाउस किपिंगसारख्या नोकऱ्या देण्यासाठी सय्यदने सहा जणांना ठकवले. यात भाऊसाहेब लक्ष्मण हंकारे, मधुकर हंकारे (दोघेही रा. तडसर), सचिन जाधव, आतिक अल्लाऊद्दीन नरवाडे, शहारुख वाहिद आलासे आणि मझहर सांगलीकर यांचा समावेश आहे. पैकी हंकारे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 
या सर्वांना नोकऱ्या देण्यापूर्वी त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा देण्याचेही आश्‍वासन सय्यदने दिले होते. नेहमीप्रमाणे पोलिस किल्ला परिसरात महेबूबचा पत्ता शोधत गेले; पण तो तेथे राहत नव्हता. त्याने त्या ठिकाणी एक दुकान गाळा भाडेतत्त्वावर घेऊन तेथे तो किराणा दुकान चालवत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दुकान महिनाभरापासून बंद असल्याचे शेजारच्या नागरिकांनी सांगितले. त्याचा मिरजेत अन्यत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याच्याबाबत माहिती मिळाली नसल्याचे 
पोलिसांनी सांगितले.

Web Title: Sangli News Dubai job fraud