आंतरजिल्हा शिक्षक बदलीची माहिती भरण्यास उद्यापर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

सांगली : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये अनेक प्राथमिक शिक्षकांना स्टाफ पोर्टलमध्ये भरलेली माहिती चुकलेली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना माहिती पूर्ण करण्यासाठी 26 मार्चपर्यंत शेवटची मुदत दिली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

सांगली : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये अनेक प्राथमिक शिक्षकांना स्टाफ पोर्टलमध्ये भरलेली माहिती चुकलेली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना माहिती पूर्ण करण्यासाठी 26 मार्चपर्यंत शेवटची मुदत दिली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना शाळा कोणत्या क्षेत्रातील आहे ते "मॅप' करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार सर्व जिल्ह्यांनी सर्व शाळांचे "मॅपिंग' केले आहे. त्यामुळे ही सुविधा बंद केली आहे. तसेच बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकारप्राप्त शिक्षक, समानीकरणासाठी रिक्त पदे, रिक्त जागा आदी माहिती भरण्यासाठीची सुविधा ट्रान्सफर पोर्टलमधील "सीईओ' यांच्या लॉगिनला उपलब्ध करयून दिली आहे. त्यामध्ये मागीलवर्षीची माहिती काढून न टाकता "अनव्हेरीफाय' करून दिली आहे. मागील वर्षीच्या माहितीमध्ये बदल करायचा असेल ते करून माहिती पुन्हा "व्हेरीफाय' करावी लागेल. त्यासाठी वेळापत्रक निश्‍चित केले आहे. बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकारप्राप्त शिक्षक, समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे, रिक्त जागा आदी माहिती भरून ती "व्हेरीफाय' करण्यासाठी 23 ते 26 मार्चअखेर मुदत आहे. तसेच बदलीपात्र शिक्षकांचे मॅपिंग करण्यासाठी 26 ते 28 मार्चअखेर मुदत आहे. या वेळापत्रकात बदल होणार नाही.

सरल प्रणालीतील स्टाफ पोर्टलमध्ये असलेल्या शिक्षकांच्या माहितीआधारे आंतरजिल्हा बदली केली जाते. यावर्षी आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरत असताना स्टाफ पोर्टलमध्ये "पर्सनल डिटेल्स, कास्ट डिटेल्स व इनिशियल अपॉईंटमेंट डिटेल्स' फॉर्ममधील माहिती तपासूनच बदली फॉर्म भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. परंतू बऱ्याच शिक्षकांनी ही माहिती भरली नाही. तसेच काहीन भरलेली असून ती "व्हेरीफाय' केली नाही. ज्या शिक्षकांनी अद्याप माहिती दुरूस्त केली नाही असे शिक्षक व नवीन यादीमधील शिक्षकांची यादी उपलब्ध करून दिली आहे. अशा शिक्षकांची माहिती त्वरीत भरून ती माहिती केंद्रप्रमुख लॉगिनमधून "व्हेरीफाय' करणे अपेक्षित आहे. त्यासाठी 26 मार्च ही शेवटची मुदतवाढ आहे. जे शिक्षक माहिती पूर्ण करणार नाहीत त्याचा फॉर्मचा आंतरजिल्हा बदलीमध्ये समावेश होणार नाही. त्यामुळे ही बाब सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यावी अशी सूचना श्री. राऊत यांनी दिली आहे.

Web Title: sangli news education teacher transfer saral pranali