"सांगली शिक्षण'साठी 53 टक्के मतदान 

"सांगली शिक्षण'साठी 53 टक्के मतदान 

सांगली - सांगली शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज दोन हजार 546 पैकी एक हजार 348 मतदारांनी मतदान केले. 52.94 टक्के मतदान झाले. सन 2012 च्या निवडणुकीत दोन हजार 448 पैकी एक हजार 441 जणांनी म्हणजे 58.38 जणांनी मतदान केले होते. गतवेळपेक्षा चुरस होती, मात्र तुलनेने मतदान कमी झाले. मृत्यू झालेल्या सहाशेवर मतदारांचा समावेश असलेली मतदार यादी, वृद्धांची मोठी संख्या यामुळे टक्का घसरल्याचे जाणकारांचे मत आहे. उद्या (ता. 11) सकाळी दहाला सिटी हायस्कूलमधील गुरुदेव रानडे सभागृहात मतमोजणी होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी व संस्थेचे कार्यवाह शशिकांत देशपांडे यांनी सांगितले. 

या निवडणुकीत नऊ जागांसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सत्ताधारी खाडिलकर-लिमये आघाडीविरोधात जोगळेकर-कोटीभास्कर यांची शिक्षण विकास आघाडी अशी सरळ लढत झाली. दोन्ही गटांकडून जाहीर सभा-बैठकांचा जोर होता. महिनाभर वातावरण चांगलेच ढवळून निघाले. संस्थेच्या इतिहासात इतक्‍या टोकाला जाऊन प्रचार झाला नव्हता, असे जुन्या सभासदांचे मत होते. सभासदांना आधीच टपालाद्वारे मतपत्रिका पोच केल्या होत्या. त्या मतपत्रिका त्यांनी स्वत- हजर राहून केंद्रावर बंद पेटीत जमा करण्याची अट होती. सांगली शहरसाठी सहा, तर महापालिका क्षेत्राबाहेर तीन, अशा नऊ जागा आहेत. दोन हजार 546 मतदार आहेत. सत्ताधारी खाडिलकर-लिमये आघाडीत विद्यमान अध्यक्ष नितीन खाडिलकर, उपाध्यक्ष जनार्दन लिमये, हरिहर भिडे, श्रीराम कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, अरविंद मराठे, किशोर कुलकर्णी, रवींद्र देवधर, रामकृष्ण आपटे, तर विरोधी कोटीभास्कर-जोगळेकर प्रणीत शिक्षण विकास आघाडीकडून किशोर शहा, गोपाळ माईनकर, माधव कुलकर्णी, माणिकराव जाधव, चिदंबर कोटीभास्कर, हरीश प्रताप, दिलीप जोगळेकर, वसंत रानडे, मिलिंद भागवत असे प्रत्येकी नऊ उमेदवार रिंगणात होते. आज सकाळपासून मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांचा उत्साह अमाप होता. सर्वत्र भाजप-संघ परिवारातील कार्यकर्त्यांची गर्दी होती. मतदान शांततेत झाले. 

केंद्रनिहाय झालेले मतदान (कंसात टक्केवारी) 
मालू हायस्कूल- 971 पैकी 471 (50 टक्के), बापट बालशिक्षण मंदिर- 853 पैकी 493 (57), माधवनगर- 96 पैकी 58 (55), तासगाव- 175 पैकी 125 (70), विटा- 107 पैकी 78 (72), पुणे- 378 पैकी 123 (32) , एकूण मतदान- 2546 पैकी 1348 (52.94 टक्के). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com