अकरावीच्या तुकड्या टिकवण्याचे आव्हान

अकरावीच्या तुकड्या टिकवण्याचे आव्हान

जिल्ह्यात १३ हजार जागा रिक्त - जिल्ह्यात दहावी पास ३९६५३, उपलब्ध प्रवेश ५३४५८ 
सांगली - दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. अकरावी प्रवेशासाठी २६ जुनपासून झुंबड उडणार आहे. अर्थात जिल्ह्यात दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३९ हजार ६५३ एवढी आहे.

अकरावीच्या तिन्ही शाखा आणि व्यवसाय शिक्षणच्या २३२ शाखांतील विद्यार्थी प्रवेश क्षमता ४५ हजार ५५८ एवढी आहे. डिप्लोमामध्ये ४९०० आणि आयटीआयमध्ये ३००० हजार प्रवेश क्षमता आहे. याचा आर्थ क्षमतेपेक्षा १३ हजार विद्यार्थी संख्या कमी आहे. 

अकरावी प्रवेशासाठी नामवंत शाळांत प्रवेशासाठीची गर्दी कायम राहणार आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही हे निश्‍चित आहे. उलट प्राथमिक, माध्यमिक शाळांप्रमाणे अकरावीच्या तुकड्या टिकवण्यासाठी विद्यार्थ्यी शोधण्याची वेळ शिक्षक आणि संस्थावर येणार आहे.  सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.४१ टक्के आहे. जिल्ह्यातील ३९ हजार ६५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्रावीण्य श्रेणीत १० हजार ९९, प्रथम श्रेणित १४ हजार ४०८, द्वितीय वर्गात १२ हजार ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पास श्रेणीत ३ हजार ७८ मुलांचा समावेश आहे. शाळांतून २४ जुनला मुळ गुणपत्रिका मिळतील. तत्पूर्वी ज्यांना गणपडताळणी करावयाची आहे ते आजपासून कोल्हापूर येथील माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडे अर्ज करु शकतात. अंतिम मुदत २३ जुन आहे. उत्तरपत्रिका छायाकिंत प्रति मिळवून गुण वाढवण्यासाठीची अंतिम मुदत ३ जुलै आहे. अकरावी प्रवेशासाठी चार शाखांच्या २३२ तुकड्या उपलब्ध आहेत. त्यात अंशतः अनुदानिक ३ तुकड्या, नवोदय १, सैनिक शाळा १, कायम विनाअनुदानित १४, विनाअनुदानीत ५, स्वयंअर्थसह्याहीतच्या २८ तुकड्यांचा समावेश आहे. कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवसाय शिक्षणमधील एकूण प्रवेश क्षमता ४४ हजार ८०७ एवढी आहे. या शिवाय आयटीआय, डिप्लोमा, चित्रकला येथेही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com