लाखोंची फसवणूक करणारा तोतया पोलिस ताब्यात

विजय पाटील
बुधवार, 16 मे 2018

सांगली -  येथील पोलिसांनी एका भामट्या पोलिसास अटक केली आहे. पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पोलीसात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तो लाखो रुपये हडप करत असे. संजय कांबळे असे या तोतया पोलिसाचे नाव आहे. एलसीबीने ही कारवाई केली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगलीच्या हरिपूर येथे संजय कांबळे हा तोतया पोलीस राहतो. त्याने हरिपूर येथील 5 ते 6 तरुणांना पोलीस भरती करतो असे सांगून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या तोतया व भामट्या पोलिसास स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने ताब्यात घेतले आहे.

Web Title: Sangli News fake police arrested in Sangli