द्राक्ष बागेत फवारणी करताना मल्लेवाडीत शेतकऱ्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

सांगली - मल्लेवाडी (ता. मिरज) द्राक्ष बागेवर फवारणी करताना चक्कर येऊन कोसळलेल्या शेतकऱ्याचा उपचार सुरु होण्याआधीच मृत्यू झाला. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. दादासाहेब तात्यासाहेब चौगुले (वय 38) असे शेतकऱ्याचे नाव आहे. 

कीटकनाशकावर बंदी असली तरी द्राक्ष बागेवर दावण्याचा प्रार्दुभाव झाल्यामुळे त्यांनी फवारणीचा निर्णय घेतला. ही फवारणी सुरू असताना ही घटना घडली. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यामध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

दादासाहेब चौगुले यांची मल्लेवाडीतील आडओढा परिसरात तीन एकर शेती आहे. पैकी दीड एकरावर द्राक्षबाग आहे. त्यांनी 28 सप्टेंबर रोजी छाटणी घेतली होती. गेल्या काही दिवसांत सतत पाऊस आणि ढगाळ हवामान आहे. त्यामुळे दावण्याचा प्राद्रुर्भाव झाला आहे. त्यातून बचावासाठी शेतकरी झुंज देत आहेत. चिखलातून वाट काढत फवारणी करत आहेत. तसाच प्रयत्न दादासाहेब यांनी दुपारी केला. फवारणी करताना त्यांना चक्कर आली. तत्काळ त्यांनी मिरजेतील वान्लेस दवाखान्यात हलवण्यात आले, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

दादासाहेब यांच्या पश्‍चात वडील, पत्नी, सहा वर्षांचा मुलगा आणि दोन मुली आहेत. एक मुलगी अकरावीत शिकते तर दुसरी पाचवीत आहे. 

Web Title: sangli news farmer dead during spraying in Grape Field