शेतकऱ्यांच्या बंदला सांगली शहरासह जिल्हाभर प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, मनसे, शिवसेना, शेकाप, माकपसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सकाळी 11 वाजता सांगली शहरातील स्टेशन चौकात जमून मोटारसायकल फेरीने जावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सांगली - "अन्नदात्यासाठी एक दिवस बंद'च्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगली शहरासह जिल्हाभरात आज बंद आंदोलन सुरु झाले आहे. अपवाद वगळता बहुतांश पेठांनी शटर डाऊन करत शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा दर्शविला आहे. 

सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा, तासगाव या प्रमुख मोठ्या शहरांसह जिल्ह्यातील बहुतांश गावांत आंदोलन सुरु आहे. दूध संकलन बंद ठेवून बहुतांश संघांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. 
कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, मनसे, शिवसेना, शेकाप, माकपसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सकाळी 11 वाजता सांगली शहरातील स्टेशन चौकात जमून मोटारसायकल फेरीने जावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर कापडपेठ, गणपती पेठ, मारुती रोड, हरभट रोड, विश्रामबाग, वसंतदादा मार्केट यार्ड या ठिकाणी बंदचे आवाहन केले. 

किरकोळ भाजीपाला विक्रेते, चहा टपरीवाले, पानपट्टीवाले आणि काही किरकोळ व्यापाऱ्यांचा अपवाद वगळता इतरांनी शंभर टक्के बंद पाळून प्रतिसाद दिला. 
या काळात जिल्हाभरातून शांततेत आंदोलन करण्यात येत आहे. एसटी किंवा खासगी वाहने अडविण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन आधीच करण्यात आले होते. त्यामुळे तोडफोड किंवा तीव्र आंदोलनाची गरज भासली नाही.  

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
नाशिकमध्ये वाढली शेतकरी संपाची धग

ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांच्या निवासस्थानी छापे
काश्मीर: सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला करणारे 4 दहशतवादी ठार
महाराष्ट्र 'बंद' यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'​
भारताचा पाकवर 124 धावांनी दणदणीत विजय​
'दानवेंच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याचा तपास करा'
मॉन्सूनचे महाराष्ट्रात गुरुवारी आगमन​
मुंबईत भाज्यांच्या किमती भडकल्या

Web Title: sangli news farmers strike bandh success in city, rural