दंडोबा वनपरिक्षेत्रामध्ये वणवा

संतोष भिसे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मिरज - मिरज-पंढरपूर रस्त्यावर दंडोबा वनपरिक्षेत्रामध्ये आज दुपारी वणवा पेटला. यामध्ये शेकडो झाडे जळून भस्मसात झाली.  वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. 

मिरज - मिरज-पंढरपूर रस्त्यावर दंडोबा वनपरिक्षेत्रामध्ये आज दुपारी वणवा पेटला. यामध्ये शेकडो झाडे जळून भस्मसात झाली.  वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. 

मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सीमेवर शेकडो एकर परिसरात दंडोबाचे जंगल पसरले आहे. नैसर्गिक उपज आणि मानवी प्रयत्नांमुळे हजारो झाडे डोंगरावर बहरली आहेत. यातील एका टापूत आज दुपारी तीनच्या सुमारास वणवा भडकला.

रस्त्याच्या कडेचे गवत कोणीतरी पेटवल्याने आग लागली व ती वनक्षेत्रात पसरली. आगीमध्ये किती झाडे जळाली हे अद्याप स्पष्ट नाही. 

- मनोजकुमार कोळी, परिक्षेत्र वन अधिकारी

खरशिंग फाट्यावरुन डोंगरमाथ्यावर जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फाची वनराई आगीच्या ज्वाळांनी वेढली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगा झपाटयाने पसरली. उन्हाचा ताण मोठा असल्याने वणवा अधिकच भडकला. आगीची माहीती मिळताच वनविभागाचा ताफा धावला.

सांगली-मिरज महापालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. पाण्याचा उपसा करणारे चार पंप उपलब्ध करण्यात आले. परिसरातील सिद्धेवाडी, भोसे, देशिंग, खरशिंग, खंडेराजुरीतील शंभरावर ग्रामस्थ मदतकार्यासाठी धावले.  संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वणवा आटोक्यात आला नव्हता. अनेक दुर्मिळ झाडे यामध्ये होरपळली.

Web Title: Sangli News fire in Dandoba forest