गावदेववेळी मांजर्डेत गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

तासगाव - विवाहानिमित्त गावदेव कार्यक्रमात मारामारी झाल्यानंतर आरवडेतील दोघांनी गावठी कट्टा एकाच्या डोक्‍याला लावून हवेत गोळीबार केला. गोळीबार करणारा पुणे पोलिसांतील रेकॉर्डवरील सराईत गुंड असल्याचे समजते. हा प्रकार मांजर्डे (ता. तासगाव) येथे शुक्रवारी (ता. २२) घडला. आज याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - मांजर्डेतील अशोक सोपान मोहिते यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त गावदेव करण्यासाठी बेंजोसह जात होते. आरवडे (ता. तासगाव) येथील दोन अज्ञातांनी नाच व दंगा सुरू केला. त्यानंतर गावातील तरुणांशी त्यांचा वाद झाला. त्या दोघांनी परत येऊन बेंजोचे साहित्य गोळा करणाऱ्या प्रवीण जाधवच्या कानपटीला कट्टा लावला. हा प्रकार अशोक मोहिते यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी संशयितांपैकी एकाने त्यांच्या दिशेने गोळी झाडली.

दुसऱ्याने हवेत गोळीबार केला. या प्रकारानंतर जमाव जमत असल्याचे पाहून त्या दोघांनी पळ काढला. पळून जाताना त्यांनी मोटारसायकल (एमएच १२ इएफ ५९५६) सोडून दिली. जमावाने मोटारसायकलची मोडतोड केली. अशोक मोहिते यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोळीबार करणाऱ्यांपैकी विशाल मधुकर खेडकर (आरवडे) पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तासगाव पोलिसांनी त्याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल केला.

दोन दिवसांनी नोंद
२२ जून रोजी झालेल्या गोळीबाराच्या प्रकाराची माहिती पोलिसांना आज गुन्हा दाखल झाल्यानंतर समजली. पुणे पोलिसांकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार आरवडे येथे राहायला आहे, याचीही माहिती तासगाव पोलिसांना नसल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Sangli News Firing in Manjarde