कुत्रा पाळायची हौस असेल तर महापालिकेकडे भरा पाच हजार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सांगली - श्‍वान पालनाची हौस आता वर्षाला जादाची पाच हजारांची चाट लावणारी ठरणार आहे. महापालिकेच्या येत्या शुक्रवारच्या (ता.20) महाभेसत याबाबतच ठराव होणार असून त्यात श्‍वानपालकाला वार्षिक शुल्क आकारणीचा विषय समाविष्ठ केला आहे.

सांगली - श्‍वान पालनाची हौस आता वर्षाला जादाची पाच हजारांची चाट लावणारी ठरणार आहे. महापालिकेच्या येत्या शुक्रवारच्या (ता.20) महाभेसत याबाबतच ठराव होणार असून त्यात श्‍वानपालकाला वार्षिक शुल्क आकारणीचा विषय समाविष्ठ केला आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांची पैदास पालिकेला रोखता येत नाही. मात्र आता जी मंडळी कुत्री पाळणार आहेत त्यांना मात्र आता पालिकेकडे पैका मोजावा लागणार आहे. 

शहरात हजारो कुत्री आहेत. त्यांच्या नसबंदीचा विषय नेहमीच गाजत असतो. किती नसबंदी झाली याचा हिशेब घालण्यात महासभेचा वेळ जात असतो. त्यातला घोळ आता सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. आरोग्य विभागासाठी आता आणखी एक कुरण खुले होत आहे. आधी आपल्या घरी कुत्रा असेल तर त्याची पालिकेकडे नोंद बंधनकारक केली होती. मात्र त्याला फारसा कुणी प्रतिसाद दिला नाही. आता मात्र या कुत्र्यांची नोंद आणि मालकांची जबाबदारी निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यासाठी आता प्रशासनाने नोंदणीसोबतच 5 हजार रुपये वार्षिक फी आकारणीचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्ताने मालकांना श्‍वानाच्या खबरदारीचीही जाणीव होईल हा यामागचा हेतू असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

शहरात काही हजारांमध्ये पाळीव कुत्री आहेत. त्यामुळे महसूलही चांगला मिळेल असे प्रशासनाला वाटते. आता या नोंदणीला प्रतिसाद किती मिळतो हा भाग वेगळा. एक निश्‍चित की या विषयावरून महासभेत गोंधळ निश्‍चित आहे. 

असे "उद्योग' करता येतील? 
शहरातील बचतगटांच्या उत्पादनांना नियमित बाजारपेठ मिळावी, यासाठीही जागा निश्‍चित केली जाणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत यासाठी प्रदर्शन आणि विक्रीसाठी येथील राजमती नेमगोंडा पाटील विद्यामंदिर (शाळा क्र. 10) च्या पश्‍चिम-दक्षिणेची बाजू देण्याचा प्रस्ताव आहे. शाळांसाठी आरक्षित जागांवर असे "उद्योग' करण्याची पालिकेला मुभा आहे का मुलभूत प्रश्‍न आहे. 

Web Title: Sangli News five thousand for domestric dog