ऐन उन्हाळ्यात प्रवाशांनी अनुभवला महापूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

मिरज - म्हैसाळ प्रकल्पाचा मुख्य कालवा ओव्हरफ्लो झाल्याने मिरज ते आरग वाहतूक ठप्प झाली. काल संध्याकाळी हा प्रकार घडला. सुमारे तासाभरानंतर पाणी उतरले. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांनी महापुराचा अनुभव घेतला.

मिरज - म्हैसाळ प्रकल्पाचा मुख्य कालवा ओव्हरफ्लो झाल्याने मिरज ते आरग वाहतूक ठप्प झाली. काल संध्याकाळी हा प्रकार घडला. सुमारे तासाभरानंतर पाणी उतरले. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांनी महापुराचा अनुभव घेतला.

कृष्णा खोरे महामंडळामार्फत म्हैसाळ योजनेतून सध्या पाणी उपसा सुरु आहे. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व जत या तालुक्यांना पाणी दिले जात आहे. म्हैसाळ आणि नरवाड येथील पंपगृहांत सुमारे तीस अजस्त्र पंप पाणी कृष्णेतून पाणी उपसून फेकत आहेत. काल संध्याकाळी वादळी वाऱ्यामुळे बेडगमधील तिसऱ्या पंपगृहाचा वीजपुरवठा खोळंबला. पंप बंद राहील्याने पाणी पुढे सरकणे थांबले, त्याचवेळी मागून मात्र पाण्याचा प्रवाह सुरुच होता. 

बेडगमध्ये तिसऱ्या पंपगृहात पाण्याचा अतिरिक्त साठा होऊन तो बंधाऱ्यावरुन बाहेर पडला. बेडग-आरग दरम्यानच्या ओढ्यात शिरला. परिणामी पंधरा-वीस मिनिटांत या रस्त्यावर सुमारे दिड-दोन फूट पाणी उभे राहीले. दुतर्फा वाहने अडकली, ऐन उन्हाळ्यात महापूर अनुभवायला मिळाला. काही शेतकऱ्यांनी याची माहीती कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांना दिली, त्यानंतर मागे बंद करुन उपसा थांबवला, पाणी उतरल्यावर वाहतुक सुरळीत झाली.

Web Title: Sangli News flood Experience in Summer