विदेशी मद्याचा साठा केला जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सांगली - कराड-तासगाव रोडवर वाळवा तालुक्‍यातील रेठरेहरणाक्ष फाटा येथे ४१ हजार ३८० रुपये इतक्‍या किमतीचा विदेशी गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एक लाख ३० हजार रुपयांच्या मोटारीचा समावेश आहे. म्हणजेच एकूण १ लाख ७१ हजार ३८० रुपये इतक्‍या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या वेळी दोघांना अटक करण्यात आली. सांगली विभागाचे उपअधीक्षक व्ही. डी. टिकोळे यांनी ही माहिती दिली.

सण आणि उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने बनावट मद्याच्या बेकायदेशीर वाहतुकीवर लक्ष ठेवले आहे. गेल्याच आठवड्यात कवठेमहांकाळजवळ एक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी कारवाई आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे व राज्य उत्पादन शुल्क सांगली विभागाचे उपअधीक्षक व्ही. डी. टिकोळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वाळवा तालुक्‍यातील रेठरेहरणाक्ष फाटा येथे टाटा इंडिका (एमएच १३ एन ७७९४) या गाडीची तपासणी करून विदेशी गोवा बनावटीच्या मॅक्‍डॉल नंबर एक व्हिस्किच्या १८० मि.ली.च्या ६४ बाटल्या, आय बी १८० मि.ली.च्या २२ बाटल्या, रॉयल स्टॅग १८० मि.ली.च्या ८२ बाटल्या, रेडरम १८० मि.ली.च्या ४८ बाटल्या, बॅगपायपर १८० मि.ली.च्या ४८ बाटल्या जप्त केल्या. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील जुनोनी येथील अस्लम अमिन मुल्लानी व कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्‍यातील हुपरी येथील तुकाराम पांडुरंग यमगर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता हे विदेशी मद्य गोवा राज्यातून खरेदी करून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: sangli news Foreign liquor