मदनभाऊ जयंतीदिनी काँग्रेस नेते सांगलीत

Former Maharashtra minister Madan Patil
Former Maharashtra minister Madan Patil

सांगली: सांगलीतील जनआक्रोश मेळाव्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील काँग्रेस नेत्यांची फौज येत्या दोन डिसेंबरला माजी मंत्री मदन पाटील यांच्या दुसऱ्या जयंतीच्या निमित्ताने सांगलीत दाखल होत आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार आमदारांसह सर्वपक्षीय नेते या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहेत. याचदिवशी माधवनगर रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या मदनभाऊंच्या पुतळ्याचे अनावरण तसेच सांगली मिरजेत काँग्रेस पक्षाचे विविध जाहीर कार्यक्रम व विकास कामांची उद्‌घाटने होतील. महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, नगरसेवक राजेश नाईक, संतोष पाटील, पांडुरंग भिसे यांनी आज (बुधवार) पत्रकारांना ही माहिती दिली.

अवघ्या सात आठ महिन्यांवरील महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी काँग्रेसने शहरातील रस्ते, पाणी योजना कामांसाठी पाठपुरावा सुरु ठेवतानाच पक्ष नेत्यांना निमंत्रित करून जाहीर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेसजण गेल्या महिन्याअखेरीस जनआक्रोश मेळाव्याच्या निमित्ताने सांगलीत दाखल झाले होते. माजी मुख्यमंत्री वसतंदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानेही काँग्रेसने शहरात शक्तीप्रदर्शन केले. आता महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसजनांचे नेते मदन पाटील यांच्या दुसऱ्या जयंतीचे निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस शहरात धुमाळी उडवून देणार आहे. दुपारी 12 वाजता पुतळा अनावरण समारंभ असेल. तेथेच कार्यक्रम होईल. त्यानंतर शहरातील काही विकास कामांचा प्रारंभही नेत्यांच्या हस्ते होईल.

श्री शिकलगार म्हणाले, "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, खासदार संजय पाटील व राजू शेट्टी, शिवसेना आमदार अनिल बाबर, भाजपचे आमदार विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, सुमन पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते लोकप्रतिनिधी या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहेत.''

मदनभाऊ स्मृती उद्यान
मदन पाटील यांच्या स्मृतीनिमित्त माधवनगर रस्त्यावर उद्यान विकसित केले जाणार आहे. तेथेच मिरजेचे शिल्पकार विजय गुजर यांनी साकारलेला नऊ फुटी पुर्णाकृती पुतळा असेल. सध्या उद्यानासभोवतीच्या कुंपणाचे काम पुर्ण झाले आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम सुरु आहे. तेथे बगीचा विकसित करतानाच शेजारी मदनभाऊंच्या स्मृतीचित्र दालनाचे नियोजन आहे. येत्या वर्षभरात उद्यानाचे काम पुर्णत्वास जाईल.

कोपर्डी बलात्कार व खून खटल्यासंबंधीची बित्तमबातमी वाचा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com