जत तालुक्यात कोल्ह्याला जीवदान देण्यात वनविभागाला यश

विजय पाटील
मंगळवार, 22 मे 2018

सांगली - जिल्ह्यातील जत तालुक्यातील वाळेखिंडी गावालगत बुरुंगलेवाडी जाधववाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोल्हा पडला. या कोल्हाला जीवदान देण्यात वनविभागाला यश आले आहे. दोन ते अडीच वर्षाच्या नर जातीच्या कोल्ह्याला उपचार करून वन अधिकाऱ्यांनी जंगलात सोडले.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांचा मुलगा अजित शिंदे याने संभाजी जाधव यांच्या मालकीच्या विहिरीत पडलेला कोल्हा दिसला. ही विहीर सुमारे ८० फूट इतकी खोल असल्याने अजित याने जाधव यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनंतर संभाजी जाधव घटनास्थळी आले व त्यांनी नवाळवाडीचे पोलिस पाटील व वनसंरक्षक समितीचे अध्यक्ष अविनाश सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला.

कडक उन्हाच्या झळात सुमारे दीड तासांच्या कालावधींनतर कोल्ह्याला बाहेर काढण्यात यश आले. त्यावेळी कोल्ह्याच्या पायाला जखम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जत येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी ए. एस. साठे, एम. एस. मुसळे, एस. एस. मुजावर हे तात्काळ घटनास्थळी पिंजरा व इतर साहित्यासह दाखल झाले. त्यांनी जत येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कोल्ह्याला दाखल केले.तेथे डॉ. गायकवाड यांनी उपचार केले. उपचारांनंतर कोल्ह्याला जंगलात सोडण्यात आले.

Web Title: Sangli News Fox survival by forest department in Jat Taluka