सांगली जिल्ह्यातील माणगंगा, महांकाली कारखान्यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सांगली - कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न दिल्या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन सारख कारखान्यांची साखर जप्त करा असा आदेश साखर आयुक्तांनी दिला. यामध्ये आटपाडी येथील माणगंगा साखर कारखाना व कवठेमहांकाळच्या महांकाली सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. 

सांगली - कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न दिल्या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांची साखर जप्त करा, असा आदेश साखर आयुक्तांनी दिला. यामध्ये आटपाडी येथील माणगंगा साखर कारखाना व कवठेमहांकाळच्या महांकाली सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. 

साखर कारखान्यांचे हंगाम संपून महिना-दीड महिना झाला तरी अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत. याबाबत अनेक वेळा अंकुश' संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे दाद मागितली तरीही कारखानदार हलत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आयुक्तांच्या दारात ठिय्या मांडला. त्याची दखल घेऊन साखर आयुक्तांनी कारवाईचे आदेश काढण्यात आले. 

अशी आहे थकबाकी 
मार्च 2018 अखेर आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्याकडे 11 कोटी 19 लाख 15 हजार, तर कवठेममहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याकडे 23 कोटी 3 लाख 42 हजार रुपये थकीत आहेत. 

कलम 3 (3 ए)नुसार त्यावर विहीत दराने देय होणारे व्याजासह कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समूजन उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅस, आदी उत्पादनांची विक्री करावी. आवश्‍यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वत:च्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पद्धतीद्वारे विक्री करून या रकमेतून ऊस पुरवठादारांना अदा करण्यात यावे, असे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

Web Title: Sangli News FRP Issue Notice to Manganga, Mahakali