गॅस सिलिंडरमागे वीस रुपये दलाली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

सांगली - घरगुती गॅस सिलिंडरच्या व्यवस्थेत शासनाने कितीही पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यातील दलालांची यंत्रणा मार्ग काढून लूटमार करीत आहे. त्यात आता सिलिंडर पुरवठा करणाऱ्या वाहनधारकांची दलाली वाढली आहे. सिलिंडरमागे वीस रुपयांच्या दलालीचा आग्रह केला जातोय. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही आणि तक्रार कुठे करायची, हा प्रश्‍न असल्याचे लोक सांगताहेत.

शहरी भागातील गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था तुलनेत पारदर्शी आहे. इथे घरपोच सुविधा दिली जातेय, ग्रामीण भागात ही व्यवस्था पूर्णपणे दलालांच्या ताब्यात आहे. ती पूर्वी होतीच. एकेका ग्राहक कार्डावर कित्येक सिलिंडर घेऊन ते जादा दराने विकणारे दलाल पोसले होते. मोबाईलवरून नंबर बुकिंग, अनुदान थेट खात्यात जमा करणे असे बदल झाल्याने ही व्यवस्था मोडून पडेल, असा अंदाज होता. तो फोल ठरला आहे. या दलालांनी नवनव्या शक्कल काढायला सुरुवात केली. आता ही व्यवस्था पुन्हा एकदा दलालांच्या हाती गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यात सिलिंडर पोच करणाऱ्या वितरण कंपन्यांचे लोकही लाभार्थी होऊन साथ देत आहेत.

ग्रामीण भागात सिलिंडर घेताना वितरण कंपनीचा कामगार वरकड २० रुपये घेतोय. ज्याला दर माहिती आहे, त्याने विचारले, ‘कशाचे?’ तर पोच करण्याचे असे सांगितले जातेय. सामान्यतः लोकांना सिलिंडरचा चालू दर काय, हेच माहिती नसते. त्यामुळे मागेल तेवढे पैसे देणे, एवढाच विषय. त्याचा गैरफायदा घेतला जातोय. दुसरीकडे गावोगावच्या दलालांनी सिलिंडर कार्डवर कब्जा केला आहे. त्यांच्याकडे सिलिंडरचा साठाही सुरू झाला आहे.

ज्यांच्याकडे कनेक्‍शन नाही किंवा ऐनवेळी सिलिंडर संपले तर याच दलालांकडून आठशे ते नऊशे रुपये मोजून सिलिंडर घ्यावा लागतो, अशी व्यवस्था झाली आहे. या साऱ्याला गॅस सिलिंडर पुरविणाऱ्या कंपन्यांचे लोकही सामील आहेत.

दरपत्रक नाही...काटा विसरलाय
गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. ती ग्रामीण भागात दिली जात नाही. गाडीवर दरपत्रक लावणे गरजेचे आहे. ते लावले जात नाही. सिलिंडरचे वजन करायचा काटा विसरला, असे सांगितले जाते. या साऱ्या बाबी गंभीर असून, त्याकडे कंपनी आणि पुरवठा विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: sangli news gas cylinder rate