थकीत बिले व्याजासह द्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

सांगली - वसंतदादा कारखान्याने उसाची थकीत बिले व्याजासह द्यावीत, असा आदेश साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील यांनी दिल्याची माहिती शेतकरी संघटना सहकार आघाडीचे संजय कोले, सुनील फराटे यांनी आज दिली. वसंतदादा कारखान्याने कपात केलेल्या ५२ कोटींच्या ठेवी व्याजासह परत करा, अशी मागणी संघटनेने केली. त्यावर श्री. कडू-पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश  कोल्हापूरचे साखर उपायुक्त सचिन रावळ यांनी दिले.

सांगली - वसंतदादा कारखान्याने उसाची थकीत बिले व्याजासह द्यावीत, असा आदेश साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील यांनी दिल्याची माहिती शेतकरी संघटना सहकार आघाडीचे संजय कोले, सुनील फराटे यांनी आज दिली. वसंतदादा कारखान्याने कपात केलेल्या ५२ कोटींच्या ठेवी व्याजासह परत करा, अशी मागणी संघटनेने केली. त्यावर श्री. कडू-पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश  कोल्हापूरचे साखर उपायुक्त सचिन रावळ यांनी दिले.

वसंतदादा कारखान्याकडून शेतकरी व कामगार यांना येणे असलेल्या थकीत रकमांबाबत शुक्रवारी (ता. ८) पुणे साखर आयुक्त कार्यालयात साखर आयुक्त श्री. कडू-पाटील यांच्या कार्यालयात बैठक झाली. शेतकरी संघटना, वसंतदादा कारखाना, श्री दत्त इंडियाचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

संघटनेचे कोले, फराटे, वसंतदादाचे अध्यक्ष विशाल पाटील, व्यवस्थापक संजय पाटील, दत्त इंडियाचे मृत्युंजय शिंदे, कामगार संघटनेचे प्रदीप शिंदे, विलास पाटील, रावसाहेब दळवी, विलास कांबळे आदी उपस्थित होते. 
बैठकीत कारखाना अध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगितले की, ‘‘ऊसबिल वसुलीसाठी शेतकरी संघटनेच्या  तक्रारीवरून साखर आयुक्तांनी महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) ने कारखाना स्थावर मालमत्तेवर बोजा चढवला आहे. त्यामुळे बॅंका त्यावर कर्जे देईनात. तेव्हा आरआरसी उठवावी.’’

ही मागणी साखर आयुक्त कडू-पाटील यांनी फेटाळली. त्यांनी सन २०१३-१४  च्या थकीत बिलासह उशिराने दिलेल्या १४-१५, १५-१६, १६-१७ च्या बिलाची रक्कम देईपर्यंतचे व्याज द्यावे.  संजय कोले म्हणाले, की या रकमा  केव्हा मिळणार हे लेखी द्यावे, त्यावर अध्यक्ष श्री. पाटील व दत्त इंडियाचे शिंदे यांनी नोव्हेंबर २०१७ अखेर रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे.   

कोले व फराटे यांनी थकीत ठेवी व व्याजाबाबत प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष श्री. पाटील यांनी सन २००६ मधील सर्वसाधारण सभेत ही ठेव रुपये सुमारे ५२ कोटी हे अनामत खात्याला वर्ग करण्याचे ठरले. त्यानंतर ते शेअर्सकडे वळवले असून त्याचे व्याज देता येणार नाही, असे सांगितले. यावर कोले म्हणाले, की आजअखेर कोणासही या रकमेतून शेअर्स देण्यात  आलेले नाहीत. तसेच आता शेतकऱ्यांना वाढीव  शेअर्सची गरज नाही. अनामत खात्याला पूर्वी ६ महिनेच रक्कम ठेवता येत असे आता ही रक्कम व्याजासह मिळायला हवी. यावर कडू-पाटील यांनी श्री. रावळ यांना चौकशी करून तातडीने माहिती देण्याचे आदेश दिले.

बैठकीत अन्य महत्त्वाचे विषय...
निवृत्त कामगार गॅज्युएटीबाबत निकाल लागलेल्यांना 
तातडीने रक्कम. 
भविष्य निर्वाह निधीची मुद्दल देण्यास कारखाना तयार.
दत्त इंडियाने शेतकऱ्यांची सर्व देणी द्यावीत, संघटनेची मागणी.
उच्च न्यायालयातील दावा काढण्याची मागणीही आयुक्तांनी फेटाळली.

Web Title: sangli news Give tired bills with interest