बसमधून महिलेचे ७ तोळे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

सांगली - सांगली-समडोळी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे सात तोळे सोन्याचे दागिने पिशवीतून लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

सांगली - सांगली-समडोळी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे सात तोळे सोन्याचे दागिने पिशवीतून लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर येथील सुनंदा दिलीप कोळी यांचे माहेर सांगली जिल्ह्यातील समडोळी येथे आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्या सांगली-समडोळी बसमधून समडोळीला निघाल्या होत्या. बस कर्नाळ पोलिस चौकीजवळ आली असता गाडीत तिकीट काढण्यासाठी त्यांनी पिशवी हातात घेतली. त्यावेळी त्यांना पिशवीत दागिने नसल्याचे लक्षात आले. त्यांनी बसमधील वाहकास याची माहिती दिली.

वाहकाने सांगली शहर पोलिसांना ही घटना सांगितली. त्यामुळे पोलिस तातडीने बसजवळ आले. त्यांनी काही प्रवाशांकडे याची चौकशी केली. मात्र त्यामध्ये काही स्पष्ट झाले नाही. बस पुढे गेली. बन्सी पेपर मिलजवळ बसमधील तिघे परप्रांतीय उतरले. त्यावेळी या परप्रांतीयांची व त्यांच्या खोलीची संशयावरून झडती घेण्यात आली. मात्र त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. यामुळे सुनंदा कोळी आणि त्यांचा भाऊ बजरंग कोळी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास रविवारी सकाळी आले होते. मात्र त्यांना दिवसभर थांबवून घेण्यात आले. सायंकाळी त्यांची कच्ची तक्रार घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Sangli News Gold ornaments theft in bus