कडेगावला ११ ग्रामपंचायतीच्या २८ जागा बिनविरोध

कडेगावला ११ ग्रामपंचायतीच्या २८ जागा बिनविरोध

कडेगाव -  तालुक्‍यातील रेणुशेवाडी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे; तर ४२ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या ३६६ जागांसाठी ८०१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरपंचपदाच्या ४० जागांसाठी १०२ उमेदवार रिंगणात आहेत.

तुपेवाडी (ये)च्या सरपंचपदी सुरेखा जालिंदर गुरव यांची, तर आंबेगावच्या सरपंचपदी सुनंदा दादा मस्के यांची बिनविरोध निवड झाली. रेणुशेवाडीचे सरपंचपद हे रिक्त राहिले आहे. तसेच, ११ ग्रामपंचायतींच्या एकूण २८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सर्व लढती काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच होणार आहेत.

गाववार बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे -

 सोनसळ : सुजाता थोरात, प्रवीण देवकर, लता गोतपागर. तुपेवाडी (ये) : जालिंदर गुरव. रेणुशेवाडी : कमल रेणुशे, अनिल रेणुशे, वनिता रेणुशे, अर्चना रेणुशे, शंकर रेणुशे. करांडेवाडी : अश्‍विनी खामकर. वडियेरायबाग : नंदाताई भगत, श्रीमंत भगत, कृष्णत कदम. पाडळी : आनंदी पाटोळे. निमसोड : हिंदुराव जाधव, शीला मुळीक, वनिता मुळीक, सविता भोगे, अझरुद्दीन मुलाणी. कडेपूर : सीमा यादव, मंदाकिनी यादव. शिवाजीनगर : सुमन जाधव. कोतवडे : अर्चना जाधव. आंबेगाव : शोभा मस्के, उषा महाडिक, सोनाली मस्के, जिजाबाई माने, सिंधुताई महाडिक. 

सोनसळ, बोंबाळेवाडी, रायगाव, हिंगणगाव बुद्रुक, उपाळे वांगी, भिकवडी खुर्द, खेराडे विटा, तोंडोली, सासपडे, उपाळे मायणी, येडे, शाळगाव, करांडेवाडी, विहापूर, बेलवडे, सोहोली, चिखली, अमरापूर, नेवरी, आंबेगाव, निमसोड, शिवाजीनगर, कडेपूर, खंबाळे औंध, अपशिंगे, नेर्ली, कोतवडे, हिंगणगाव खुर्द, तडसर, हणमंतवडिये, येवलेवाडी, वडियेरायबाग, शेळकबाव, पाडळी, आसद, वांगी, मोहिते वडगाव, देवराष्ट्रे, शिरगाव, कुंभारगाव, खेराडे वांगी, तुपेवाडी (ये.) या ४२ ग्रामपंचायतींसाठी आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्याविरुद्ध माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या पारंपरिक गटांत लढती होणार आहेत. तुपेवाडी (ये.) येथे एक व रेणुशेवाडी येथे सरपंचपदासह दोन जागांवर अर्जच न आल्याने येथील या दोन ग्रामपंचायतींच्या तीन जागा रिक्त राहिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com