सांगलीत झेडपी, बाजार समिती, जिल्हा बॅंक ओस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सांगली -  जिल्ह्यातील ४२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे झेडपी, जिल्हा aबॅंक, बाजार समित्या, १० पंचायत समित्यांतील पदाधिकारी, सदस्य निवडणुकीत मग्न आहेत. त्यामुळे कार्यालयातील वर्दळ थंडावली  आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्वच संस्थांतील विकासकामांना ब्रेक लागला आहे. जिल्हाभरातून कामांसाठी येणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. 

झेडपी सदस्य, जिल्हा बॅंक, बाजार समिती, १० पंचायत समित्यांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, सदस्य आपापल्या मतदारसंघातील गावांच्या निवडणुकीत मग्न आहेत. त्यांचा थेट सहभाग नसला तरी अप्रत्यक्षपणे यंत्रणा हलवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते.  आपापल्या गावात मात्र त्यांचा थेट सहभाग आहे. जिल्हा परिषदेचे ६०, तर पंचायत समितीचे १२० मतदारसंघ आहेत. जिल्हा बॅंक आणि बाजार समितीच्या प्रत्येकी तेवीस संचालकांनी ताकद पणाला लावली आहे. जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींपैकी ४५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यातील  २५ गावच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. निवडणुका लागलेल्या गावातील अनेक गावांतील जागांवर अनेक सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. 

विशेष म्हणजे झेडपी, दहा पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये झाल्या आहेत. साहजिकच त्या निवडणुकीची गडद छाया ग्रामपंचायत निवडणुकीवर राहणार आहे. अवघ्या आठ महिन्यांत निवडणुका लागल्याने नेत्यांची पंचाईत तर मतदार खुशीत आहेत. गाव पातळीवर या निवडणुका होत असल्या तरी त्याचे पडसाद पक्षीय पातळीवर उमटतात.

कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या भेटी
झेडपी, पंचायत समितीसह बाजार समिती, जिल्हा बॅंक अधिकाऱ्यांना विविध कामांच्या शिल्लक फायलींवर  निर्णय घेण्यास कालावधी मिळाला आहे. झेडपीच्या अधिकाऱ्यांनी स्विय निधी खर्चण्यासाठी सर्व ती तयारी  सुरू आहे. कामाचा बोजा कमी झाल्यामुळे आपापल्या  कार्यक्षेत्रात भेटी देऊन अधिकाऱ्यांनी तपासण्या सुरू केल्या आहेत.

Web Title: Sangli News Grampanchayat Election