किरकोळ वाद वगळता कडेगाव तालुक्यात शांततेत मतदान

किरकोळ वाद वगळता कडेगाव तालुक्यात शांततेत मतदान

कडेगाव - तालुक्‍यातील बेचाळीस ग्रामपंचायतीसाठी आज मोठ्या उत्साहात व चुरशीने मतदान झाले. सकाळी आठ वाजता मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावण्यास सुरुवात केली. त्यांनतर अकरा वाजल्यानंतर मात्र मतदारांचा थंडा प्रतिसाद मिळाला. तर दुपारी तीन वाजेपर्यंत 42 गावात 37 हजार 587 पुरुष तर 36 हजार 836 स्त्री मतदार असे एकूण 74 हजार 423 मतदारांनी म्हणजे 78.44 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.तर एकूण वडियेरायबाग,देवराष्ट्रे व तोंडोली येथे किरकोळ वादावादी वगळता सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. 

तालुक्‍यातील बोंबाळेवाडी,रायगाव,हिंगणगाव बुद्रुक,उपाळे वांगी,भिकवडी खुर्द,खेराडे विटा,तोंडोली,सासपडे,उपाळे मायणी, येडे, शाळगाव, करांडेवाडी, विहापूर, बेलवडे, सोहोली, चिखली, अमरापूर, नेवरी, आंबेगाव, निमसोड, शिवाजीनगर, कडेपूर, खंबाळे औंध, अपशिंगे, नेर्ली, कोतवडे, हिंगणगाव खुर्द, तडसर, हणमंतवडिये, येवलेवाडी, वडियेरायबाग, शेळकबाव, पाडळी, आसद, वांगी, मोहितेवडगाव, देवराष्ट्रे, शिरगाव ,कुंभारगाव, खेराडे  वांगी, सोनसळ, तुपेवाडी(ये) या 42 गावातील 175 मतदान केंद्रावर आज सकाळी साडे सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला.

साडे सात वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळेत सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या.त्यांनतर मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत गर्दी कमी झाली होती.तीननंतर पुन्हा मतदारांनी सर्वत्र रांगा लावण्यास सुरुवात केली होती.तसेच मतदान केंद्रापासून लांब असलेल्या व वाड्या वस्त्यावरील मतदारांना आणण्यासाठी दोन्ही गटाच्यावतीने वाहनांची सोय करण्यात आली होती. मतदान करुन घेण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकत्यामध्ये चुरस निर्माण झाली होती.तर त्यांना आपल्याच गाडीत बसवून आणण्यासाठी काही गावातील कार्यकर्त्यामध्ये वादावादीचेही प्रकार घडले.

या निवडणुकीत मतदार व कार्यकर्त्यांनाही मोठ्याप्रमाणात रसद पुरवली जात असल्यामुळे मतदान करवून घेण्यासाठी कार्यकर्ते चांगलेच धावपळ करीत होते.मतदारही उत्स्फुर्तपणे मतदानाला येत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. 
सकाळी साडेसात वाजतता थोडा थंडा प्रतिसाद मिळाल्यानंतर नऊ वाजल्यानंतर मात्र मतदारांनी रांगा लावल्या होत्या.सकाळी 9.30 वाजेपर्यंत 16.04 टक्के, 11.30 वाजता 40.51 टक्के,दुपारी 1.30 वाजता 64.75 टक्के,3.30 वाजता 78.44 टक्के असे 42 गावात मतदान झाले होते.निवडणुक प्रक्रिया सुुरळीत होण्यासाठी येथील 175 मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.त्यामुळे सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

वडियेरायबाग, देवराष्ट्रे व तोंडोली येथे किरकोळ वादावादी वगळता सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. आमदार डॉ.पतंगराव कदम, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्‍वजित कदम, डॉ.शिवाजीराव कदम यांनी सोनसळ येथे तर आमदार मोहनराव कदम यांनी चिंचणी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी कडेपूर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.तालुक्‍यातील अमरापूर,मोहिते वडगाव, वांगी, तडसर, हिंगणगाव खुर्द, शाळगाव, सोहोली, देवराष्ट्रे येथे कॉंग्रेस व भाजपमध्ये चुरशीचा सामना पहायला मिळाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com