आटपाडी तालुका ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपकडे सात तर शिवसेनेकडे सहा

आटपाडी तालुका ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपकडे सात तर शिवसेनेकडे सहा

आटपाडी - तालुक्यातील निवडणूक झालेल्या 15 ग्रामपंचायतीपैकी सात ग्रामपंचायतीत भाजपचे कमळ फुलले आहे तर शिवसेनेने सहा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे. अवघ्या दोन ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व राखले.

तालुक्याचे लक्ष लागलेली आटपाडी आणि करगणीत सरपंच पदासाठी बाजी मारत शिवसेनेने भाजपचा धुव्वा उडवला. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या संयुक्त युतीला मतदारांनी जोरदार धक्का दिला.    

या गावात भाजपचे सरपंच -

1)मासाळवाडी 2) विभूतवाडी 3) बनपुरी 4) मापटेमळा 5) निंबवडे 6) काळेवाडी 7) भिंगेवाडी  

या गावात शिवसेनेचे सरपंच  - 

1) आटपाडी 2) करगणी  3) पिंपरी खुर्द 4) पुजारवाडी 5) मिटकी  6) खांनजोडवाडी        

या गावात कॉंग्रेसचे सरपंच -

1)मानेवाडी 2) नेलकरंजी  

तालुक्यातील 20 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली होती त्यातील पाच बिनविरोध झाल्या तर पंधरासाठी मतदान झाले होते. यात आटपाडी ग्रामपंचायतीवर नगरपंचायत होणार असल्यामुळे बहिष्काराचा मुददा गाजला होता. शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने भाजपचे पंधरा सदस्य बिनविरोध निवडून आले होते. भाजपमुळे सरपंचपदासाठी निवडणूक लागली होती.

सरपंचपदासाठी भाजप आणि सेनेत लढत लागली होती. तर दोन सदस्यपदासाठी भाजप आणि अपक्ष सामना रंगला होता. शिवसेनेच्या सरपंच पदाच्या उमेदवार वृषाली धनंजय पाटील यांनी भाजपच्या नांगरे यांचा पराभव केला. आटपाडी आणि करगणीचा पराभव भाजपसाठी धक्का मानला जात आहे. प्रभाग एक मध्ये अपक्ष आणि सेनेने पाठिंबा दिलेले उमेदवार विजय झाले. करगणीत अकरा सदस्य आणि सरपंच निवडून आणत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवले. बनपुरीत भाजपच्या सुनीता पाटील या सरपंचपदी 260 मतानी निवडून आल्या.

गाववार निवडूण आलेले सरपंच असे 

1) आटपाडी - वृषाली धनंजय पाटील.

2) करगणी - गणेश खंदारे   

3) बनपुरी - सुनिता महादेव पाटील 

4) मिटकी - दादासाहेब कोळेकर  

5) मासाळवाडी - सखुबाई तळे

6) विभूतवाडी - चंद्रकांत पावणे

7) पिंपरी खुदॅ - सुनिता कदम.

8) पुजारवाडी - मंगल मोटे

9 )नेलकरंजी - बाळासो भोसले.

10) भिंगेवाडी -  बाळासाहेब हजारे  

11 )खांनजोनवाडी - रामदास सूर्यवंशी

12) मापटेमळा - रघुनाथ माळी

13) काळेवाडी - सिताबाई काळे

14) निंबवडे -  मंदाताई जेठे

15 )मानेवाडी -अमोल खरात 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com