जत, आटपाडी तालुक्‍यातील गावगाड्यात भाजप समर्थकांना ‘धक्का’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

सांगली - लोकसभा, विधानसभेची निवडणूक वर्षावर येऊन ठेवल्याने तालुक्‍याच्या राजकारणात प्रचंड महत्त्व प्राप्त झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. जत, आटपाडी तालुक्‍यातील गावगाड्यात भाजप समर्थकांना अनेक ठिक्का धक्का बसला. शिराळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या देशमुख-नाईक आघाडीला ‘अच्छे दिन’ पहायला मिळाले.

जल्लोष, उत्साहात निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि  त्यानंतर गावागावांत मिरवणुका काढण्यात आल्या. 
जिल्ह्यातील ७१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज सकाळी तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरवात झाली. जत,  आटपाडी आणि शिराळा या तीन तालुक्‍यांत सर्वाधिक ग्रामपंचायतींची निवडणूक होती. 

खानापूर, कडेगाव, पलूसमध्येही निवडणूक लागली होती. त्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या चार प्रमुख पक्षांच्या  समर्थकांत घमासान झाले होते. बहुतांश गावांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्या झाल्या होत्या. स्थानिक आघाड्याही होत्या. त्यात भाजपच्या समर्थकांना मात्र अपेक्षित यश आले नसल्याचे एकूण चित्र समोर आले आहे. 

जतमध्ये आमदार जगताप यांना घरचे मैदान राखता आले नाही. आटपाडीत माजी आमदार राजेंद्र देशमुख, गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख यांची ताकद असताना शिवसेनेने ग्रामपंचायतीवर भगवा फडकववला आहे. तेथे भाजपला ७ तर शिवसेनेला ६ ठिकाणी यश मिळाले  आहे. शिराळ्यात पाच ठिकाणी भाजप, नऊ ठिकाणी काँग्रेस तर अन्यत्र राष्ट्रवादीसह स्थानिक आघाड्यांची सत्ता आली आहे. कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच भारी ठरली असून ६ ठिकाणी सत्ता मिळवली आहे. भाजपमधील खासदार समर्थकांना ४ तर माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थकांना चार ठिकाणी यश मिळाले आहे.

कडेगावातील दोन्ही ग्रामपंचायती काँग्रेसच्या  ताब्यात आल्या असून खानापूर तालुक्‍यात काँग्रेस, भाजप, शिवसेनेला संमिश्र यश मिळाले आहे.

Web Title: Sangli News Grampanchayat Election result