कसबे डिग्रजमध्ये राष्ट्रवादीचाच डंका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

तुंग -  मिरज पश्‍चिम भागात अत्यंत संवेदनशील गावात राष्ट्रवादीने बाजी मारत गावपातळीवर सत्तेवरील पकड कायम ठेवली. कसबे डिग्रजमध्ये मोहन देशमुख, अजयसिंह चव्हाण, अण्णासाहेब सायमोते यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 13-4 अशा फरकाने बाजी मारत झेंडा फडकावला. तेथे जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले यांच्या कॉंग्रेससह सदाभाऊ, शेट्टी समर्थकांना पराभवाला सामोरे जावे लागले.

मौजे डिग्रजमध्ये उद्योजक भालचंद्र पाटील, स्वाभिमानीचे कुमार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या संयोगिता कोळी समर्थक गटाने 7-6 अशा बहुमतासह सरपंचपदी झेंडा रोवला. समडोळीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीने बाजी मारली. स्वाभिमानी, संभाजी पवार गटाला येथे धक्का बसला.

13-4 फरकासह सरपंचपदी कब्जा केला. दुधगावमध्ये राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी पवार समर्थक गटाचा पराभव करीत सरपंचपदासह सत्ता मिळवली. सावळवाडीत रवी माणगावे गटाने नितीन दणाने गटाचा पराभव करत 6-4 फरक आणि सरपंचपदासह राष्ट्रवादीला सत्ता मिळवून दिली. माळवाडीत स्वाभिमानी व राष्ट्रवादीने सरपंचपदासह बाजी मारली. या पट्टयात जयंत पाटील समर्थकांनी दबदबा कायम राखला. कॉंग्रेससह राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सदाभाऊ खोत यांच्या गटांनी एकत्र ताकद लावली तरी त्यांना यश मिळाले नाही. 

एका मताची किमया 
मौजे डिग्रजमध्ये प्रभाग दोनमध्ये प्रणिता कांबळे यांनी कॉंग्रेसच्या अलका कुरणे यांचा केवळ एका मताने पराभव केला. या पराभवामुळे डिग्रजच्या सत्तेचे पारडेही राष्ट्रवादीकडे झुकले. तेथे राष्ट्रवादी 7 तर कॉंग्रेसचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. 

धाकटा जिंकला 

कसबे डिग्रजमध्ये प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांनी कॉंग्रेसकडून लढणारे सख्खे भाऊ दत्तात्रय शिंदे यांचा पराभव केला. धाकटा भाऊ जिंकला तर मोठ्याला पराभव पत्करावा लागला. 
 
Web Title: Sangli News Grampanchayat Election Result