आटपाडी तालुक्‍यात कमळच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

आटपाडी - आटपाडी तालुक्‍यात निवडणूक लागलेल्या २१ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती ताब्यात ठेवून भाजपने वर्चस्व राखले. तर कडवी झुंज देऊन आठ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकवला. अन्य तीन ठिकाणी संमिश्र आघाड्याची सत्ता आली.

आटपाडी - आटपाडी तालुक्‍यात निवडणूक लागलेल्या २१ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती ताब्यात ठेवून भाजपने वर्चस्व राखले. तर कडवी झुंज देऊन आठ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकवला. अन्य तीन ठिकाणी संमिश्र आघाड्याची सत्ता आली.

तालुक्‍यात २६ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील पाच बिनविरोध झाल्या, तर २१ ची निवडणूक लागली होती. यात भाजप आणि सेनेतच  समोरा-समोर लढत होती. तर दिघंची आणि खरसुंडीत काँग्रेस मैदानात उतरली होती. पडळकर आणि देशमुख गट एकत्र असल्यामुळे मोठी ताकद वाढली होती.

बहुसंख्य ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून झेडपीचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, गोपीचंद पडळकर, समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी थेट प्रचारात उडी घेतली होती. त्यांनी गावोगावी कोपरा सभा घेऊन वातावरण तापवले होते. खासदार संजय पाटील यांनीही दिघंचीत सभा घेतली  होती. तर सेनेकडून आमदार अनिल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजीराव पाटील यांनी सूत्रे हालविली. त्यांनी थेट गावात जाऊन मतदान मागितले नाही तसेच सभाही घेतल्या नाहीत. तरीही सेनेने लक्षवेधी  ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.

२१ पैकी १० ग्रामपंचायतींवर भाजपची, तर आठ वर सेनेची सत्ता आली अन्य तीन ठिकाणी संमिश्र सत्ता  आली. यात दिघंची, खरसुंडी, कौठूळी, गोमेवाडी, हिवतड, पळसखेल, राजेवाडी, लिंगीवरे, जांभूळणी, चिंचाळे, पिंपरी बुद्रुक मध्ये सत्तांतर झाले. दिघंचीत राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख यांची पंधरा वर्षांची सत्ता सेनेने संपुष्टात आणली. तेथे माजी सभापती जयमाला देशमुख यांचा सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. त्यांचा पराभव झाला. हिवतड मध्येही माजी सभापती सुमन देशमुख यांची सत्ता गेली तर कौठूळीत माजी सरपंच शिवाजीराव कदम यांचाही परभव झाला.

श्री. पडळकर यांच्या गडात झरेत सेनेने कडवी झुंज दिली. तेथे  अवघ्या तार मतानी सरपंच उमेदवाराचा पराभव झाला. या ठिकाणी मतमोजणीवरून जोरदार वाद आणि गोंधळ  झाला. सेनेने मतमोजणीला आक्षेप घेतला होता. लिंगीवरे, उंबरगाव, चिंचाळे, कुरुंदवाडी, राजेवाडी या पाच ग्रामपंचायतींवर भाजप आणि सेनेनेही दावा केला आहे.

भाजप दहा, सेनेकडे आठ; तर चार संमिश्र

भाजपचे सरपंच 
माळेवाडी, हिवतड, तडवळे, कौठुळी, आवळाई, जांभूळणी, झरे, चिंचाळे, घाणंद, वलवण.

शिवसेना सरपंच-
दिघंची, गोमेवाडी, गळवेवाडी, खरसुंडी, पुजारवाडी(दिघंची), पिंपरी बुद्रुक, पळसखेल, राजेवाडी.

संमिश्र-
लिंगीवरे(स्थानिक आघाडी सेना-भाजप), उंबरगाव (भाजप-सेना), कुरुंदवाडी(संमिश्र)

आटपाडी तालुक्‍यातील विजयी उमेदवारः  
कौठुळी - सरपंच-गणपती मंडले. सदस्य-नवनाथ कदम, सीमा लोहार, रंजना मगर, बापू लोहार, आप्पासाहेब कदम, सुसाबाई कदम, आप्पासाहेब गवळी.
 माळेवाडी - सरपंच- सौ. शालन जगताप. सदस्य- हारूण मुजावर, कविता चव्हाण, शांताबाई औताडे, रेखा लोहार, रावसाहेब पवार, रूपाली पवार, सविता माने.
 कुरुंदवाडी -  सरपंच-सौ. सविता तातोबा वगरे, सदस्य बिरूदेव खोत, लक्ष्मी चवरे, सुहास चवरे, शीतल खोत, भीमराव खोत, सुरेश चवरे, उषाताई भानुसे.
 खरसुंडी - सरपंच सौ. लता अर्जुन पुजारी. सदस्य-  नितीन पुजारी, पूनम इंगवले, सलीमा शिकलगार, मोहन शिंदे, मंगल डोंगरे, मीना साळुंखे, दिलीप जानकर, जितेंद्र पाटील, ज्योती पुजारी, सुभाष केंगार, विजयकुमार भांगे, नंदिनी केंगार, दिगंबर भांगे, लता जावीर, सूवर्णा पुजारी.
 घाणंद - सरपंच-मारुती सीताराम होनमाने. सदस्य- जोतिराम पाटील, सुनीता लोहार, छगु ढगे, पांडुरंग माने, उमेश ढगे, शांताबाई ढगे, कुंडलिक झंजे, प्रियंका होनमाने, सुवर्ण कटरे.
 हिवतड - सरपंच सौ. रूपाली उमाजी सरगर, सदस्य- वसंत माळी, सुरेखा काळे, शहाजी यमगर, विनोद पवार, महादेवी जवळे, शुभांगी मम्हाणे, अनिल घुटुगडे, शालन खांडेकर, शारदा माने.
झरे - सरपंच सौ. सिदू माने. सदस्य- भाऊ घोरपडे, संगीता चव्हाण, आनंदीबाई पाटील, हणमंत मोटे,  इंद्राबाई पाटील, पारूबाई नुसे, धनंजय वाघमारे, रामचंद्र राऊत, सुनीता दीक्षित, अंकुश सुळे, शारदा सोळसे.
 जांभूळणी - सरपंच- सौ. संगीता शिवराम मासाळ, सदस्य- मोहन माने, विमल जुगदर, पोपट घुटुगडे, मंगल गावडे, मालन झंजे, दगडू जुगदर, आशाताई घुटुगडे.
तडवळे - सरपंच-श्रीमती हिराबाई गिडे, सदस्य- जितेंद्र गिड्डे, नंदकुमार गिड्डे, सविता गटकुळ, विकास गावडे, सुमन गुड्डे, शालन हुबाले, सुनील देवकुळे, रेश्‍मा ऐवळे, रेश्‍मा सोहनी.
 गळवेवाडी -  सरपंच-सुरेखा सोमेश्‍वर पाटील. सदस्य- माणिक गळवे, विमल गळवे, मुक्‍ताबाई गळवे, लव गळवे, शोभा गवळे, भामाबाई गळवे, प्रकाश गळवे, संजय केंगार, अनिता काळे.
गोमेवाडी - सरपंच-नंदकुमार दबडे. सदस्य- शहाजी जगताप, राजाक्‍का जाधव, विमल शेंडगे, अनिल खरात, आशा सरगर, अर्जुन जावीर, उद्धव घाडगे, अरुण माने, सुनील देवकुळे, रेश्‍मा ऐवळे, रेश्‍मा सोहनी.
 पुजारवाडी -  सरपंच सौ. अनिता होनमाने. सदस्य- अविनाश काळे, वैभव मोरे, विजय पवार, अनिता पुजारी, चैत्राली मिसाळ.
राजेवाडी - सरपंच- द्रौपदा कोडलकर, सदस्य-गजेंद्र चांगणे, सुरेश शिरकांडे, सुनीता माने, बापूराव मोरे, विमल हेगडे, दीपाली चव्हाण.
 उंबरगाव - सरपंच- शिवाजी कुचेकर, सदस्य-आप्पासाहेब फडतरे, मधुकर ठोंबरे, पारूबाई पिसे, सुनील गाढवे, मंगल सावंत, स्वाती बुधावले, अशोक दडस, नूतन शिनगारे, सविता गाढवे.
पिंपरी बुद्रुक - सरपंच-श्रीमंत तरसे, सदस्य- सतीश जाधव, सखुबाई लोहार, सर्जेराव चव्हाण, सुनीता पवार, माणिक पवार, शीतल जावीर, कोंडाबाई पवार.
 चिंचाळे -  सरपंच- आशाताई चोपडे, सदस्य- गोपाळ गायकवाड, निर्मला कदम, सुवर्णा गायकवाड, दिलीप लोखंडे, विजय कदम, पल्लवी जगदाळे, सुरेंद्र गायकवाड, माधुरी मंडले, अनिल जरग.
पळसखेल - सरपंच- सौ. कौशल्या कुचेकर. सदस्य- विठ्ठल कुचेकर, सौ. शालन पवार, आप्पासाहेब सावंत, राधिका काळे, गणेश वाघ, ताराबाई सावंत, सुनील सावंत.
 आवळाई - सरपंच- बाबासाहेब जाधव, सदस्य- अरुण वाघमारे, दादासाहेब भिवरे, यशोदा साळुंखे, ज्ञानेश्‍वर पिसे, नकुसा सावळकर, मंगल हेगडे, शरद शेंडे, कल्पना वाघमारे, छाया इरकर. 
 लिंगीवरे -  सरपंच-विराज बापूसाहेब पुजारी, सदस्य- कौशल्या माने, उत्तम ठोंबरे, नंदकुमार चाचर, तेजश्री खटके, आत्माराम खटके, जोतिराम मगदूम.
 वलवण - सरपंच-दगडू गेजगे, सदस्य- तातोबा जाधव, मारुती जाधव, कांचन पाटील, उषा जाधव, महादेव माने, लक्षमी भिसे, प्रशांत पाटील, सविता करांडे, सावित्री पोळ.
 दिघंची - सरपंच अमोल मोरे, सदस्य-जितेंद्र मोरे, मनीषा पुसावळे, मालती जावीर, सागर ढोले, नितीन होनराव, खतिजा तांबोळी, भाग्यश्री पांढरे, प्रणव गुरव, केशव मिसाळ, प्रकाश शिंदे, आक्‍काताई मोरे, बाळाबाई बुधावले, विद्या गुरव, आशाराणी नळ, तेजश्री मोरे, मोहिनी जावीर, मीनाबाई धोतरे. 

Web Title: Sangli News Grampanchayat Election result