सांगली जिल्ह्यातील 71 गावांत चुरशीने मतदान सुरु 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

सांगली - जिल्ह्यातील 71 गावांतील कारभारी ठरवण्यासाठी आज सकाळी साडेपासूनपासून मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. एक लाख 29 हजार 579 मतदार असलेल्या या गावांत सध्या चुरशीने मतदान सुरु आहे. गावांत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे गावागावातील गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. विशेषतः दुष्काळी आणि डोंगरी भागातील बहुतांश ग्रामपंचायती आहेत. नेत्यांनीही गावागावांतील आपले गट मजबूत करण्यासाठी या निवडणुकांवर बाहेरून लक्ष ठेवले आहे. 

जिल्ह्यात एकूण 82 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यात कवठेमहांकाळ तालुक्‍यातील 18, मिरजेतील 3, जतमधील 6, खानापुरातील 4, आटपाडीतील 20, पलूसमधील 2, कडेगावातील 2, शिराळ्यातील 27 ग्रामपंचायतींचा समावेश होता. पैकी 11 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे आता 71 ग्रामपंचयातींसाठी निवडणूक होत आहे. मिरज तालुक्‍यातील 6, तासगाव तालुक्‍यातील 4, जतमधील 7, आटपाडीतील 2, खानापुरातील 3, कडेगावातील 3, पलूसमधून 3, वाळव्यातील 6, शिराळ्यातील सहा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूकही लागली आहे. 

Web Title: Sangli News Grampanchayat Election Voting