द्राक्षवाहतूक टेम्पो पळवणाऱ्या आठजणांना पकडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

तासगाव - द्राक्षवाहतूक करणारा टेम्पो आणि २ लाख रुपये टेम्पोचालकाला मारहाण करून टेम्पोसह दहशत माजवून लुटून नेल्याप्रकरणी वाळवा येथील ८ जणांना झटपट हालचाली करून सूत्रधारासह अटक करून ७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना मंगळवारी घडली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये हा गुन्हा उघडकीस आणला.

तासगाव - द्राक्षवाहतूक करणारा टेम्पो आणि २ लाख रुपये टेम्पोचालकाला मारहाण करून टेम्पोसह दहशत माजवून लुटून नेल्याप्रकरणी वाळवा येथील ८ जणांना झटपट हालचाली करून सूत्रधारासह अटक करून ७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना मंगळवारी घडली होती. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये हा गुन्हा उघडकीस आणला.

याप्रकरणी राकेश शिवाजी पाटील (वय ३०) संग्राम रावसाहेब पाटील (वय २६), निहाल इसाक लांडगे  (वय २५), रवींद्र राजाराम तुपे (वय ३१), शरद ऊर्फ गोट्या बबन लोहार (वय २७), संतोष ऊर्फ महेश बाबू बनसोडे (वय २९), योगेश चंद्रकांत चव्हाण (वय २४), अमोल गणपती सावंत (वय २४, सर्व रा. वाळवा ता. वाळवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या सर्वांना १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला. यामध्ये इस्माईल हुसेनबा मोमीन (रा. कुडची) यांनी द्राक्ष वाहतुकीसाठी असलेला टेम्पो आणि २ लाख रुपये चार मोबाईल तोंडाला रुमाल बांधेलाल्या अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याची फिर्याद तासगाव पोलिसात दिली होती. 

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, कुडची (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील इस्माईल महंमदहनीफ शेख हा द्राक्ष दलाल आहे. या दलालाचा एजंट म्हणून राकेश शिवाजी पाटील हा काम करत होता. या दलालाने वाळवा येथील एका द्राक्षबागातयदाराची द्राक्षबाग ठरविली. मात्र बागेतील निम्मी द्राक्षे तोडून नेली आणि उरलेली द्राक्षे नेण्यासाठी टाळाटाळ करू लागला.

एजंट असलेल्या राकेश पाटीलने याबाबत शेतकरी विचारणा करू लागल्याने चिडलेल्या राकेशने संग्राम पाटील, निहाल लांडगे, रवींद्र तुपे, शरद लोहार, संतोष बनसोडे, वगैरे  साथीदारांना घेऊन येळावी ता. तासगाव रस्त्यावर  इस्माईल शेखचा द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो (केए २२ सी २९८६) अडवून इस्माईल शेखचा दिवाणजी इस्माईल मोमीन याच्यासह तीन जणांना मारहाण करून टेम्पोसह २ लाख रुपये पळवून नेले. पोलिसात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल होता. 

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर दलालाच्या कामगारांपैकी एकाने राकेश पाटील याचा आवाज ओळखला होता. त्यावरून पोलिसांनी झटपट हालचाली करून राकेश पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर साऱ्या प्रकरणाचा उलगडा झाला. राकेश पाटील याच्यासह आठ जणांना अटक करून त्यांच्याकडील २ लाख रुपये रोख रक्‍कम, ४ लाख किमतीचा टेम्पो, चार मोबाईल, गुन्ह्यामध्ये वापरलेल्या ४ मोटारसायकली असा ७ लाख २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पोलिस अधीक्षक सुहेश शर्मा, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडीले, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके, सहा. पोलिस फौजदार संजय माने, राजेंद्र थोरावडे, हेमंतकुमार ओमासे, विलास मोहिते, किरण खाडे, दरिबा बंडगर, विनोद सकटे, महेश्‍वर मासाळ, सतीश खोत, महादेव हसबे या पथकाने अवघ्या काही तासांमध्ये गुन्ह्याचा छडा लावून  संशयितांना अटक केली.

Web Title: Sangli News Grape transport tempo stolen incidence