राष्ट्र विकास सेनेचे सांगलीत अर्धनग्न आंदोलन 

विजय पाटील
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाने हरकती मागविण्यात होत्या. त्यानुसार राष्ट्र विकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज हरकती दाखल केल्या. पालिकेत चार एेवजी दोनच नगरसेवक असावेत या मागणीसाठी त्यांनी अर्धनग्न आंदोलनही केले.

सांगली, मिरज आणि कुपवाड  महापालिकाच्या निवडणूका लवकरच जाहीर होणार आहेत. आज महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाच्या समोर हरकती दाखल करण्यात येत आहेत. यावेळी राष्ट्र विकास सेनेने निवडणूक आयोगासमोर अर्ध नग्न आंदोलन केले. आधी महापालिकेत दोन नगरसेवक होते. पण प्रत्येक वॉर्डात काहीच कामे झाली आहेत. आता चार नगरसेवक झाल्यास विकास आणखीन रखडला जाईल. गेल्या पाच वर्षात नागरिकांचा काहीही विकास झाला नाही. यासाठी पालिकेत चार एेवजी दोन नगरसेवक असावेत. अशी मागणी राष्ट्र विकास सेनेने केली. तसेच तृतीयपंथीयांना व मागासवर्गीयांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशीही त्यांनी मागणी केली.  

Web Title: Sangli News half naked agitation for two corp orators