सांगलीत रंगपंचमी दरम्यान हुल्लडबाज तरूणांची एकास मारहाण

विजय पाटील
मंगळवार, 6 मार्च 2018

सांगली - रंगपंचमी दरम्यान शहरात हुल्लडबाजीचा प्रकार घडला आहे. एका दाम्पत्याच्या गाडीला हुल्लडबाजी करणाऱ्या तरूणांनी धडक दिली. त्यांनतर हे तरूण त्यांच्या गाडीचा पाठलाग केला व मारहाण केली. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगली शहरातील शंभर फुटी रोडवर काही तरूणमुळे रंगपंचमी खेळत होते. यावेळी या रस्त्यावरून गाडीतून एक कुटूंब जात होते. या कुटूंबाच्या गाडीला या तरूणांनी धडक दिली. या घटनेनंतर या तरूणांनी या दांपत्याच्या गाडीचा पाठलाग केला व मारहाण केली. घटनेनंतर या दांपत्यांने तातडीने पोलिसांना प्रकार सांगितला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या प्रकारावरून विश्राम बाग पोलीस या हुल्लडबाजी तरुणाचा शोध घेत आहेत.

Web Title: Sangli News Hitting incident during Rangapanchami