खासगी सावकाराच्या त्रासाने पती बेपत्ता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

सांगली - खासगी सावकाराच्या त्रासाने पती बेपत्ता झाल्याची व्यथा पत्नीने मांडली आहे. उज्ज्वला किशोर पोळ यांनी याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम आणि पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांना याबाबत निवेदनही दिले आहे. 

उज्ज्वला किशोर पोळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कर्नाळ रस्त्यावरील संगमेश्‍वर नगरमध्ये माझे पती किशोर पोळ, मुलगा, सून, नातू असे आमचे एकत्रित कुटूंब आहे. पती किशोर यांचा किराणा साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायातील चढ उतारामुळे ते अर्थिक अडचणीत होते.

त्यामुळे त्यांनी काही खासगी सावकारांकडून पैसे घेतले. त्यांनी दहा ते पंधरा टक्के चक्रवाढ व्याजाची आकारणी सुरु केली होती. अवाजवी रक्कमेच्या परतफेडीपोटी सावकारांनी काही धनादेश, स्टॅम्प पेपर जबरदस्तीने सही करुन घेतले आहेत. त्याचा गैरवापर करुन त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्या त्रासानेत 4 मार्च रोजी पती किशोर यांनी कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेले. ते बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिस ठाण्यात दिली आहे. वीस दिवस झाले, तरी त्यांचा पत्ता लागत नाही. त्यांचा तत्काळ शोध घ्यावा. बेकायदा व मनमानीपणे खासगी सावकारी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई कारवी. त्या सावकारांनी घेतलेले चेक, बॉंड जप्त करुन रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आहे.

Web Title: sangli news husband missing by private money lender crime